भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10

Economy of India in Marathi

Table of Contents

भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती  | Economy of India Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती

Economy of India in Marathi

भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy)मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मात्र १९९१ सालानंतर उदारिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे भारताचे उद्योग, व्यापार क्षेत्र विस्तारले. परिणामी सध्या भारताची वाटचाल मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. १९५१ साली भारताची सुमारे ६० टक्के जनता ही कृषी तसेच कृषीशी संलग्नीत अन्य व्यवसायांमधून अर्थार्जन करत होती. मात्र सध्या भारतात तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यापार, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांत बरीच प्रगती झाली आहे. ज्यामुळे सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. २०१८ साली जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर होती.

जागतिक बँकेनुसार २०१८ साली भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७३ ट्रिलियन डॉलर्स होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थचे आकारमान ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.

अर्थशास्त्र म्हणजे काय? | What is Economics in Marathi?

अर्थव्यवस्थेतील उत्पादन, विभाजन, विनिमय व उपभोग या चार प्रकाराच्या व्यवहारांचा शास्त्रीय व पद्धतशीर अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय.

अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजुंची चर्चा केली जाते. म्हणुनच अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र ठरते.

अर्थव्यवस्था म्हणजे काय? | What is the Economy in Marathi?

उत्पादन, विभाजन, विनीमय व उपभोग या चार आर्थिक व्यवहाराशी संबधित संस्थाच्या एकत्रिकरणातून अर्थव्यवस्था निर्माण होते.


आणखी माहिती वाचा :  भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1


अर्थव्यवस्थांचे प्रकार  | Types of Economies in Marathi

एखादया देशाची अर्थव्यवस्था ही वस्तु व सेवांच्या उत्पादन व वापराच्या पद्धतीवरून ठरते.

उत्पादन साधनांच्या मालकीवरून (From Ownership of Means of Production in Marathi)

  • भांडवलशाही अर्थव्यवस्था
  • समाजवादी अर्थव्यवस्था
  • मिश्र अर्थव्यवस्था

भांडवलशाही अर्थव्यवस्था  | Capitalist Economy

उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. उत्पादन व किमती बाजार यंत्रणेद्वारे ठरतात. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात.

वैशिष्टये

  • उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क
  • ग्राहक हे सार्वभौम असतात.
  • बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.
  • किंमत ठरण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते.

समाजवादी अर्थव्यवस्था  | Socialist Economy

उत्पादनाची साधने सरकारी मालकिची असतात. व वस्तुंचे आणि सेवांचे उत्पादन, विभाजन सरकारमार्फत चालते. याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.

वैशिष्ट्ये

  • उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात.
  • सर्व निर्णय सरकार घेते.
  • वस्तु व सेवांचे उत्पादन नफ्यासाठी होत नाही.
  • खाजगी भांडवलाला वाव नसतो.

मिश्र अर्थव्यवस्था | Mixed Economy

भांडवलशाही व समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थेतील चांगल्या गुणवैशिष्टयांचा स्वीकार करून दोन्ही अर्थव्यवस्थांचे सहअस्तित्व दर्शविणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था होय.

विकासाच्या अवस्थेनुसार  | Depending on the Stage of Development in Marathi

भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनसशील अर्थव्यवस्था आहे. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार केला आहे. मात्र – 1991 च्या आर्थिक सुधारणांपासून मुक्त अर्थव्यवस्था होत आहे.

विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार  | Types of Economies according to stage of Development

  • विकसित अर्थव्यवस्था
  • विकसनशील अर्थव्यवस्था

विकसित अर्थव्यवस्था | Developed Economy

दरडोई उत्पन्नाचे प्रमाण जास्त, साक्षरतेचे उच्च प्रमाण, जास्त औद्योगिकरण, घटता जन्म व मृत्यूदर अशी लक्षणे दिसून येणारे अर्थव्यवस्थेला विकसीत अर्थव्यवस्था म्हणतात.

उदा. जपान, अमेरीका, जर्मनी, इ.

विकसनशील अर्थव्यवस्था | Developing Economies

ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी, साक्षरतेचे कमी प्रमाण, कमी औद्योगिकरण, उच्च जन्म व मृत्यूदर, कृषी आधारीत लोकसंख्या, अशी लक्षणे दिसून येतात त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात.

उदा. भारत, श्रीलंका, चीन, आफ्रिका, इ.

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे  | Sectors of the Economy in Marathi

व्यवसायानुसार (By Business) अर्थव्यवस्थेची पाच प्रकारची क्षेत्रे आढळून येतात –

  • प्राथमिक क्षेत्र नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधीत व्यवसाय या क्षेत्रात येतात. उदा. शेती, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, खाणकाम, या व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो.
  • व्दितीयक क्षेत्र प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तुवर प्रक्रिया करून दुसय्रा प्रकारच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे यास उद्योग क्षेत्र असेही म्हणतात. उदा. कारखानदारी, बांधकाम, वीजनिर्मिती, या व्यवसायांचा समावेश व्दितीयक क्षेत्रात होतो.
  • तृतीयक क्षेत्र प्राथमिक व व्दितीयक क्षेत्रांना पुरक सेवांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो. याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. व्यापार, वाहतुक, दळणवळण, संरक्षण, प्रशासन, यांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो.
  • चतुर्थक क्षेत्र उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर या क्षेत्रामध्ये होतो. उच्च ज्ञानाशी संबंधित संकल्पनाची निर्मिती, संशोधन व विकास, यांचा संबंध चतुर्थक क्षेत्राशी येतो. उदा. सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान, संशोधन व विकास इ.
  • पंचम क्षेत्रपंचम क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिये चा समावेश होतो. उदा. सरकार, विज्ञान, विद्यापीठे, आरोग्य सेवा या क्षेत्रातील उच्च स्तरीय संचालक व अधिकारी यांचा समावेश होतो.

आणखी माहिती वाचा : भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2


मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे  | Sectors of the Economy by Ownership in Marathi

  • सार्वजनिक क्षेत्र
  • खाजगी क्षेत्र
  • संयुक्त क्षेत्र
  • सहकारी क्षेत्र

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये  | Characteristics of Indian Economy in Marathi

  • कमी दरडोई उत्पन्न देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्वाचे निर्देशांक आहे. दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे, मात्र त्याचा स्तर कमीच राहीला.
  • उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी
  • कृषी क्षेत्राचे प्राबल्य भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहेच मात्र त्याबरोबरच त्याच्या वाढीचा दरही कमीच आहे. कृषी हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे, मात्र कृषी क्षेत्राचा GDP मधील वाटा कमी आहे.
  •     2013 -14 : 17.5 %
  •     2015 -16 : 15.4%
  •     2017-18: 14.8 %
  • आर्थिक विषमता भारतात उत्पन्नाची मोठया प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिकच गरीब दिसून येतो.
  • लोकसंख्या विस्फोट 1901 साली भारताची लोकसंख्या84 कोटी झाली. 2011 मध्ये 121 कोटी झाली. या आकडेवारीतूनच लोकसंख्या विस्फोट झालेला दिसून येतो. 2011 च्या जनगणनानुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17.5 टक्के एवढी आहे. मात्र भारताचे क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळांच्या फक्त 2.42 टक्के एवढेच आहेत.
  • गरीबी व बेरोजगारी दारीद्रयाचे मोजमाप करताना विविध मुद्दे विचारात घेऊन विविध समित्या नेमल्या गेल्या. त्यानुसार दारिद्रयाची आकडेवारीही वेगवेगळी ठरते तरीही भारतातील दारिद्रय जास्तच आहे. भारतातील लोकसंख्या विस्फोटामुळे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. 15 ते 60 वयोगटातील कार्यक्षम लोकांचे प्रमाण जास्त मात्र त्या प्रमाणात रोजगार नाही.
  • भांडवल कमी व्यवसायात गुंतवणूक करून मालमत्ता निर्माण करणे. म्हणजे भांडवल निर्मिती होय. बचतीतून भांडवल निर्माण होते. मात्र अशा भांडवल निर्मितीचा दर भारतात खूप कमी आहे.
  • औदयोगिकरण कमीसाहजिकच भांडवल कमी असल्याने व्यवसाय व औदयोगिकरण कमी असणे किंबहूना आहे. म्हणून अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी औदयोगिकरणाचा अभाव जाणवतो.
  • पायाभूत सुविधांचा अभाव रस्ते, विमान, जलमार्ग, दळणवळण सुविधा यांचा अभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करताना दिसून येतो. म्हणून पायाभूत सुविधांचा अभाव हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्टयच म्हणावे लागेल.
  • कमी दर्जाचे तंत्रज्ञान कमी दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कृषी व औदयोगिक विकासात अडचण निर्माण होते.

आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*