भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती
Rainfall of India in Marathi : भारतात सरासरी पर्जन्यमान 125 सेमी आहे. ज्यामध्ये 75 टक्के नैऋत्य मान्सून (जून ते सप्टेंबर), 13 टक्के ईशान्य मान्सून (ऑक्टोबर ते डिसेंबर), 10 टक्के स्थानिक प्री-मॉन्सून चक्रीवादळ (एप्रिल ते मे) आणि 2 टक्के वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होते. (डिसेंबर ते फेब्रुवारी) आहे. पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात 400 सेंटीमीटर पाऊस पडतो.तर राजस्थानचा पश्चिम भाग आणि लगतच्या गुजरात, हरियाणा आणि पंजाबमध्ये 60 सेंटीमीटर इतका कमी पाऊस पडतो.
प्रतिरोध पर्जन्य : पश्चिम घाटामुळे मान्सून वारे अडवले जाऊन ते उर्ध्वमुखी बनतात. उंचीवर थंड हवेमुळे त्यांच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्यामुळे पश्चिम घाट उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो.
पर्जन्याचे असमान वितरण | Uneven distribution of rainfall in Marathi
उंचीनुसार पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. त्यानुसार, महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे वार्षिक 594 सें.मी. पाऊस पडतो, तर पायथ्याशी असलेल्या ‘वाई’ येथे केवळ 54 सें.मी. पाऊस पडतो. (पर्जन्यछायेचा प्रदेश) अशाच प्रकारे बंगालच्या उपसागरावरून वाहणारे मान्सून वारे पूर्वेकडील उंच टेकड्यांमुळे अडवले जाऊन चेरापूंजी, मॉसिनराम (मेघालय) येथे वार्षिक 1200 सें.मी. पाऊस पडतो, तर चेरापूंजीच्या उत्तरेला खासी टेकड्यांच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातील ‘शिलाँग’ येथे 140. सें.मी. व गुवाहाटी येथे 100 सें.मी. पाऊस पडतो.
मेघालयातील मॉसिनराम येथे भारतातील तसेच जगातील सर्वाधिक पावसाची नोंद होते.
कर्नाटकातील आगुम्बे (जि. शिमोगा) येथे वार्षिक सरासरी 7640 मिमी. पाऊस पडतो. आगुम्बेला ‘दक्षिणेकडील चेरापुंजी’ असे म्हणतात कारण, ईशान्य भारतानंतर पठारी प्रदेशात आगुम्बे हेच सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.
अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेयर येथे मे महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून वार्षिक सरासरी 3000 मिमी पाऊस पडतो.
आवर्त : पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे व पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावरून येणारी वादळे यामुळे तेथील प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो. त्यास ‘आवर्त’ म्हणतात.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2010-14 या काळात भारतात वार्षिक सरासरी 1083 मि.मी. पाऊस झाला.
मान्सून अंदाज : भारतात मान्सूनचा एकूण अंदाज व्यक्त करण्यासाठी भारतीय हवामान खाते ‘दीर्घकालीन सरासरी’ (Long Period Average) ही संकल्पना पाया म्हणून वापरते. त्यासाठी 1951 ते 2000 या पन्नास वर्षांच्या काळात भारतात पडलेल्या पावसाची 89 सेंमी या सरासरीचा आधार घेतला जातो.
या दीर्घकालीन सरासरीच्या टक्केवारीच्या प्रमाणाचे 5 प्रकारात वर्गीकरण केले जाते.
90% पेक्षा कमी प्रमाण : अपूरा पाऊस
90 ते 96 टक्के : सामान्यपेक्षा कमी पाऊस
96 ते 104 टक्के : सामान्य पाऊस
104 ते 110 टक्के : सामान्यपेक्षा अधिक पाऊस
110 टक्क्यापेक्षा अधिक प्रमाण : पावसाचे अधिक्य
आणखी माहिती वाचा : भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
भारतातील पर्जन्य विभाग | Rainfall Division of India in Marathi
अति कमी पावसाचा प्रदेश (40 सें.मी. पेक्षा कमी पाऊस) : कच्छचे रण (गुजरात), पश्चिम राजस्थान, जम्मू-काश्मीरचा उत्तर भाग, नैऋत्य पंजाब, पश्चिम हरियाणा.
कमी पावसाचा प्रदेश (40 सें.मी. ते 60 सें.मी.) : पूर्व राजस्थान, पश्चिम गुजरात, पश्चिम पंजाब, पूर्व हरियाणा आणि द. भारतातील पर्जन्यछायेचा प्रदेश.
मध्यम पर्जन्याचा प्रदेश (60 सें.मी. ते 150 सें.मी.) : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश (भारताचा बहुतांश भाग)
जास्त पर्जन्याचा प्रदेश (150 ते 250 सें.मी.) : हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग, आसाम
अति जास्त पर्जन्याचा प्रदेश (250 सें.मी. पेक्षा जास्त) : पश्चिम किनारा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम.
भारतीय पर्जन्याची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian rainfall in Marathi
भारतीय पर्जन्याची वैशिष्ट्ये : वितरणातील असमानता. अनिश्चितता व अनियमितता.
केंद्रीतता : वर्षाचा सर्व पाऊस एखाद्या महिन्यात पडतो व बाकीचे महिने कोरडे.
चलक्षमता : म्हणजे सरासरी वार्षिक पर्जन्यापेक्षा जास्त किंवा कमी पाऊस पडणे.
अवर्षण : ज्या प्रदेशात 50 सें.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो, अशा भागात अवर्षणाची स्थिती निर्माण होते.
कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने : सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, शुष्क बर्फ (घन CO.) द्रवरुप प्रॉपेन.
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ‘सी डॉप्लर रडार’ वापरले जाते.
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply