Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत

Fathers Day Quotes In Marathi

Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत | Fathers Day Wishes In Marathi | Miss You पप्पा कोट्स मराठी

Fathers Day Quotes In Marathi

Fathers Day Quotes In Marath : फादर्स डे साठी काही कोट्स (Happy fathers day quotes in marathi) तुम्ही तुमच्या वडिलांना आनंदी करण्यासाठी गिफ्ट देताना वापरू शकता. बाबा हा नेहमीच आपला पहिला हिरो असतो. बाबांशिवाय कुटुंब हे अपूर्ण आहे. अशाच आपल्या प्रिय बाबांसाठी काही खास कोट्स.

  • निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील.
  • आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला.
  • माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
  • आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
  • कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय
  • कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा (Happy fathers day quotes in Marathi)
  • जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात (fathers day quotes in marathi)
  • तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा
  • माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो – क्लेरेन्स बलिंग्टन केलंड
  • आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं – जोहान स्किलर

Fathers Day Wishes In Marathi | Fathers Day शुभेच्छा मराठीत

वडील म्हटलं की जितका जिव्हाळा असतो तितकीच भीतीही वाटते. ही अर्थातच आदरयुक्त भीती असते. पण आता वडील आणि मुलीचं अथवा मुलाचं नातं बदलताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आईप्रमाणेच वडील आपल्या मुलांचे मित्र म्हणून वागतात. आपल्या वडिलांसाठी असेच काही भावनात्मक कोट्स (fathers day wishes in Marathi)

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,

माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही.


स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा


बाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो.


बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन

मुलांसाठी झटणारं अंतःकरण

(fathers day wishes in marathi)


आणखी माहिती वाचा : Birthday wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा


आपल्या संकटावर निधड्या छातीने

मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात


कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा

शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा


आपले दुःख मनात ठेऊन

दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’


घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –

Happy Fathers Day In Marathi.


बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत.


एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …तो म्हणजे बाबा . (fathers day wishes in Marathi)

Fathers Day Miss You Quotes In Marathi | Miss You पप्पा कोट्स मराठी

बाबा ही अशी व्यक्ती असते ज्याच्याशी मतभेद होतात. कधीतरी पटतही नाही. पण त्याचा सर्वात जास्त आधार असतो. बाबा असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीशी सामना करताना आधार असतो. पण बाबा गेल्यानंतर मात्र त्यांची उणीव जास्त भासते. फादर्स डे च्या दिवशी तर बाबांची अधिक आठवण येते. अशावेळी काही स्टेटस ठेवायचे असतील तर तुम्हाला या लेखाचा उपयोग होईल.

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,

माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.


आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला

पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa


तुमची आठवण तर रोज येते

पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते.


बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते.


आयुष्य तर जगत आहे

पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही.

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…Happy Fathers Day In Marathi


बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे

आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं.

बाबा तुम्ही परत या….


आणखी माहिती वाचा : Motivational Quotes in Marathi |  प्रेरणादायी विचार मराठी मध्ये


आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत…Miss u Baba


बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!

Fathers Day Messages In Marathi | बाबांसाठी मराठीतून संदेश

बाबांसाठी या फादर्स डे ला तुम्ही मराठी संदेश पाठवा आणि त्यांना आनंदी करा. तुमच्या बाबांना द्या खास शुभेच्छा.

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं

तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे


तुम्ही कितीही मोठे झाला तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – Happy fathers day


माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे

मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

प्रेम करतो आपल्यावर


हिरो हे केवळ पडद्यावर नसतात

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day


आईसाठी खूप लिखाण केलं जातं

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण

आजचा दिवस आहे खास म्हणूनच

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे.


माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे

कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

Fathers Day Wishes For Father In Law In Marathi | सासऱ्यांसाठी फादर्स डे च्या शुभेच्छा

सासरे हे आपल्या घरातील आधारस्तंभ असतात. आपल्या घरातील वडिलधारी व्यक्ती असलेल्या सासऱ्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा तुम्हालाही देता येतील.

मी या जगात स्वःतला लकी समजते की वडिलांच्या रूपात मला तुमच्यासारखे सासरे मिळाले. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.


जेव्हा देव तुमच्यावर खूष असतो तेव्हा तुमच्या आयुष्यात सासऱ्यांच्या रूपातही चांगली व्यक्ती पाठवतो.

जी तुम्हाला वडिलांसारखे प्रेम देते. अशा देवदूतासमान सासऱ्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा


तुम्ही मला नेहमी मुलीप्रमाणे वागवलंत. याबद्दल मी तुमचे आणि देवाचे आभार मानते. पितृदिनाच्या शुभेच्छा सासरेबुवा.


फादर्स डे च्या शुभेच्छांच्या निमित्ताने आज मला तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी

परक्या घरात येऊनही तुम्ही मला कधी काही उणीव भासू दिली नाहीत. नशीबवान आहे मी जी तुमच्या घरची सून झाले. हॅपी फादर्स डे सासरेबुवा


तुम्ही फक्त एक चांगले सासरेच नाहीतर एक चांगली व्यक्तीही आहात. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.


आज तुमचा दिवस आहे आणि देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. हॅपी फादर्स डे आप्पा.


वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना हॅपी फादर्स डे, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.


एका अद्भूत आणि शानदार सासरे असणाऱ्या माझ्या वडिलांना खूप धन्यवाद आणि फादर्स डे कोट्स मराठी तून मी भरपूर शुभेच्छा देते.


माझ्या जीवनातील खास व्यक्तींमध्ये तुमचा समावेश होतो. सासऱ्यांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.


आणखी माहिती वाचा : Sad Quotes In Marathi | सॅड कोट्स मराठीतून | love sad Quotes


Fathers Day Quotes In Marathi From Daughter | मुलीकडून बाबांसाठी फादर्स डे कोट्स

मुली या प्रत्येक वडिलांसाठी खास असतात आणि मुलीसाठीही वडील म्हणजे सर्व काही असते. एकवेळ इतर कोणालाही दुखावलेले मुलीला चालते पण बाबांसाठीची जागा ही कायम अढळ असते. लाडक्या बाबांना पाठवा.

जाताना मुलगी सासरी

धाय मोकलून रडत असते

पण माझ्या चिऊला सुखात ठेवा

असं हात जोडून सांगणारा असतो तो बाप


स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली तुम्ही

खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी, तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा


मी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर कायम बाबाच असतील.


प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते

परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते, पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


मुलगी असले तरीही मला योग्य दिशा दाखवलीत आणि कायम माझा आदर केलात याबद्दल धन्यवाद बाबा – Happy Fathers Day In Marathi


इतर कोणाहीपेक्षा तुम्ही दाखविलेला विश्वास मला अधिक मोठं करतो


मुलगी झाली असं म्हणून तोंड फिरणाऱ्यांना दिली तुम्ही चपराक

कायम दिली मला साथ

कधीही न फिटणारं ऋण आहे तुमचं माझ्यावर – Happy Fathers Day In Marathi


इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही

माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे


आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल,

पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच


हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच व्यक्ती ती म्हणजे बाबा

 


आणखी Quotes वाचा

Quotes in Marathi
1 Life quotes in Marathi | जीवनावर मेसेज मराठी
2Success Quotes in Marathi | यशासाठी प्रोत्साहित करणारे विचार
3Emotional Quotes In Marathi | मराठी भावनिक कोट्स
4Good night quotes in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठीत
5जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Women’s Day Quotes In Marathi
6मदर्स डे मराठी शुभेच्छा | Mothers Day Quotes in Marathi
7मैत्री दिनाच्या शुभेच्छा | Friendship Quotes in Marathi
8सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत | Self-Love Quotes in Marathi
9मराठीत ॲटिट्यूड कोट्स | Attitude quotes in Marathi
10शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत | Good morning quotes in Marathi
11Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
12Motivational Quotes in Marathi |  प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
13Sad Quotes In Marathi | सॅड कोट्स मराठीतून | love sad Quotes
14Aai Quotes in Marathi | आईसाठी स्पेशल मराठी सुविचार
15Guru Purnima Quotes in Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमधून
16Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
17Friendship day wishes in marathi | Friendship day quotes in marathi 2024

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*