Women’s Day Quotes In Marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Mahila Din Quotes In Marathi | Womens Day Wishes In Marathi
Womens Day Wishes In Marathi : आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. समाजात महिलांना समान अधिकार मिळावेत, प्रत्येक महिलेला त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच कोणत्याही क्षेत्रात महिलांशी होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या हक्कांकडे लोकांचे लक्ष वेधून त्यांना जागरुक करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी आवर्जून आपल्या आयुष्यातील ‘तिला’ शुभेच्छा मेसेज पाठवतोच. म्हणूनच तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणीला किंवा आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या महिलेला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश मेसेज देत आहोत. | Women’s Day Quotes In Marathi
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…
Happy Women’s Day!!
तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा! | Women’s Day Quotes In Marathi
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! | Women’s Day Quotes In Marathi
आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! | Mahila Din Quotes In Marathi
सुखदुःखात साथ देतेस,
थकत नाहीस कधीच,
आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा,
साथ सोडू नको कधीच
महिला दिनाच्या शुभेच्छा!
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!! | Mahila Din Quotes In Marathi
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी माहिती वाचा : Guru Purnima Quotes in Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमधून
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! | Mahila Din Quotes In Marathi
आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! | Mahila Din Quotes In Marathi
जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती सून आहे,
ती सासू आहे, ती आजी आहे.
पण याआधी ती एक स्त्री आहे.
जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Mahila Din Quotes In Marathi
ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…
Happy Women’s Day!
स्त्री असते एक आई,
स्त्री असते एक ताई,
स्त्री असते एक पत्नी,
स्त्री असते एक मैत्रिण,
प्रत्येक भूमिकेतील ‘ती’चा करा सन्मान.
महिला दिनाच्या शुभेच्छा.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.
महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण
संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!! | Womens Day Wishes In Marathi
आईच्या आईपणाला शुभेच्छा…
बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा…
मैत्रीण नावाच्या विश्वासाला
शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक
स्त्री शक्तीला
महिला दिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा. | Womens Day Wishes In Marathi
आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
आणखी Quotes वाचा
Leave a Reply