सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत | Self-Love Quotes in Marathi

Self-Love Quotes in Marathi

Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत | Self Love Caption in Marathi | स्वतःवर प्रेम कसे करावे

Self-Love Quotes in Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Self-Love Quotes in Marathi : लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते की आपण आपल्या मोठ्यांचा आदर केला पाहिजे आणि आपल्या लहानांवर प्रेम केले पाहिजे. एक गोष्ट आहे जी आपल्याला कधीच शिकवली जात नाही आणि ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. असे म्हणतात की इतरांवर प्रेम करण्यापूर्वी एखाद्याने स्वतःवर कसे प्रेम करावे हे जाणून घेतले पाहिजे. आयुष्यात कधी एकटेपणा जाणवला आणि आपल्यावर प्रेम करायला कोणी नाही असं वाटत असेल तर स्वतःवर प्रेम करण्याची कला कामी येते. यासाठी मराठीसल्लाने स्वत:वर प्रेम करणाऱ्या कोट्स आणल्या आहेत. | SELF LOVE WISHESH IN MARATHI

स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा.

स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही.

सुधारण्यासाठी काम केल्यास,

स्वाभिमान जपला जातो आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो.


कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका.

स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे.


अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे.


प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल,

बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल.


कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका.

कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.


आणखी माहिती वाचा : Guru Purnima Quotes in Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमधून


जे माझा  आदर करत नाहीत त्यांचा मी आदर करत नाही.

तुम्ही याला अहंकार म्हणत असाल पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे.


स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असं नाही.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण स्वाभिमान जपणं हेदेखील महत्त्वाचं आहे.

स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये  कोणतीच गोष्ट असू शकत नाही.

कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते.


आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो.

मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या मताचा जास्त विचार का करतो?

मताचा आदर करा पण स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्त्व द्या.


लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका.

लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार.

पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहीलं तर अशा लोकांचा विचार मनातही येत नाही.


स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा.


हवं तसं जगायला आवडतं मला,

लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये.


अहंकार नक्कीच नकारात्मक आहे,

पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे.


जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार?

अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका. स्वाभिमान जपा.


आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत


कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही.

पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता.


तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका. तुमच्या मेसेज,

कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा,

यालाच ‘स्वाभिमान’ असं म्हणतात.


एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की, ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल त्यांच्यासाठी. वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा. मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही.


“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,

स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी

तुम्हाला शोधत येईल.”


नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा.

पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षी स्वाभिमान जपा


कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही.

कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही


बऱ्याच मुलींना लक्ष वेधून घ्यायचं असतं पण खऱ्या स्त्री ला हवा असतो तो आदर,

तिच्या स्वाभिमानाचा केलेला आदर


आणखी Quotes वाचा

Quotes in Marathi
1 Life quotes in Marathi | जीवनावर मेसेज मराठी
2Success Quotes in Marathi | यशासाठी प्रोत्साहित करणारे विचार
3Emotional Quotes In Marathi | मराठी भावनिक कोट्स
4Good night quotes in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठीत
5जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Women’s Day Quotes In Marathi
6मदर्स डे मराठी शुभेच्छा | Mothers Day Quotes in Marathi
7मैत्री दिनाच्या शुभेच्छा | Friendship Quotes in Marathi
8सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत | Self-Love Quotes in Marathi
9मराठीत ॲटिट्यूड कोट्स | Attitude quotes in Marathi
10शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत | Good morning quotes in Marathi
11Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
12Motivational Quotes in Marathi |  प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
13Sad Quotes In Marathi | सॅड कोट्स मराठीतून | love sad Quotes
14Aai Quotes in Marathi | आईसाठी स्पेशल मराठी सुविचार
15Guru Purnima Quotes in Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमधून
16Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
17Friendship day wishes in marathi | Friendship day quotes in marathi 2024

 

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*