Life quotes in Marathi | Quotes on Life in Marathi | जीवनावर मेसेज मराठी | Motivational Quotes in Marathi for Success
आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दु: खी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू असू तर आपण देवानं दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच, जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच ‘संघर्ष’ आहे.
आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत Quotes on life in Marathi. हे सगळे लाइफ कोट्स इन मराठी ना केवळ आपल्याला आपले लाइफ समजायला मदत करतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायला देखील प्रोत्साहन देतील. आम्ही हे सगळे status in Marathi on life मराठी मध्ये तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.
समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!!
आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते,
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.
जो दुसर्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
मी दुनियेबरोबर “लढु” शकते
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!
आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.
तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.
ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने
जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…..
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…..
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.
आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.
आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.
“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”
आणखी माहिती वाचा : Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.
कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात
तर ते दुर पळतात.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
जखम आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले
जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
माणसाला “बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …
पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसर्याला सांभाळत न्यावं लागतं.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते …..
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……?
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे
तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत.
ते मिळवावे लागतात.
Marathi Status on Life
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात….
जीवन हे यश आणि अपयश
यांचे मिश्रण आहे…
नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर..
आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर..
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
“आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका …
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही.”
जीवनावरील सुंदर विचार
“कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात….
स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो ..”
‘तडजोड’ म्हणजे सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण भविष्य तर त्यांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात.
आणखी Quotes वाचा
Leave a Reply