भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7

River system of India in Marathi

Table of Contents

भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती

River system of India in Marathi

River system of India in Marathi : मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती, आपण ह्या आधी बरेसे माहिती घेतली आहे, आज आपण भारताची नदीप्रणाली बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

भारतीय नदीप्रणाली प्रामुख्याने दोन गटांत विभागली जाते.

  • हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या.
  • भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या.

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या | Rivers originating in the Himalayas in Marathi

सिंधु, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी.

हिमालयीन नद्या बारमाही व युवावस्थेतील नद्या आहेत. यांच्या अपक्षरण कार्यामुळे ‘V’ आकाराची दरी, खोल घळई, धबधबे, द्रुतप्रवाह ही भूरूपे तयार होतात. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या असे दोन प्रकार पडतात.

अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या | Rivers flowing into the Arabian Sea in Marathi

सिंधू नदी (Indus River) :

उगम : मानस सरोवराच्या उत्तरेस. (तिबेटमध्ये-कैलास पर्वतावर) सिंधू नदी भारतात जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश करते. ही नदी चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशांतून वाहते. काश्मीरमधून वाहत जाऊन गिलगिट येथे पाकिस्तानात प्रवेश करते. (सिंधूची लांबी पाकिस्तानात सर्वाधिक आहे.)

एकूण लांबी : 2880 कि.मी.

भारतातील लांबी : 800 कि.मी.

पाकिस्तानात कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रास मिळते.

सिंधूच्या भारतातील उपनद्या : झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास, श्योक, झास्कर, गिलगिट, सतलज.

19 सप्टेंबर 1960 च्या सिंधू पाणी वाटप करारानुसार सिंधू खोऱ्यातील फक्त 20% पाणी भारत वापरू शकतो, हे पाणी पंजाब, हरियाणा ही राज्ये तसेच दक्षिण व पश्चिम राजस्थानमध्ये सिंचनासाठी वापरले जाते. सियाचीन (लांबी 70 किमी), बल्तोरो, हिस्पार या हिमालयाच्या काराकोरम भागातील प्रमुख हिमनद्यांमुळे सिंधू नदीला वर्षभर पाणी असते.

सतलज नदी :

उगम : मानस सरोवराजवळील राकस सरोवरात, .

सतलज नदीचे मूळ नाव : शतदू, शताद्री

लांबी : 1450 किमी

सतलजची भारतातील लांबी : 1050 किमी

सतलज नदी शिप्किला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते.

हिमाचल प्रदेश व पंजाबमधून वाहत पाकिस्तानात सिंधूला मिळते.) पंजाब म्हणजे झेलम, सतलज, रावी, चिनाब व बियास या पाच नद्यांचा प्रदेश, चिनाब ही सर्वात मोठी नदी.


आणखी माहिती वाचा :  भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1


बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या | Rivers flowing into the Bay of Bengal in Marathi

गंगा नदी :

  • उगम : कुमाऊँ हिमालयातील गंगोत्री येथे हिमनदीपासून उगम. .
  • भारतातील सर्वाधिक लांबीची नदी (2525 किमी)
  • अलकनंदा : (उगम : अलकापुरी, उत्तराखंड) भागिरथी (उगम : गंगोत्री) या दोन नद्या ‘देवप्रयाग’ येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहास ‘गंगा’ असे नामाभिधान आहे.
  • उत्तराखंड व उत्तर प्रदेश या दोन राज्यांतच गंगेची लांबी सुमारे 1200 कि.मी. आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांतून गंगा वाहते.
  • राजमहल टेकड्यांना वळसा घालून गंगा दक्षिणेकडे वळते तेव्हा फराक्का धरणाजवळ हुगळी ही गंगेची पहिली व सर्वात मोठी वितरिका तयार होते व ती प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये वाहते (हुगळीची लांबी : 260 किमी). भागीरथी व जालंगी नद्यांच्या प्रवाहातून हुगळी हा प्रवाह तयार होतो.
  • गंगा ही भारतातील पाच राज्यांतून व बांगला देशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे. बांगलादेशात गंगेस ‘पद्मा’ या नावे ओळखले जाते. येथेच तिला ब्रह्मपुत्रा येऊन मिळते. गंगा (पद्मा) व ब्रह्मपुत्रा संयुक्तपणे बांगला देशातील चंदिपूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळतात.

गंगेच्या प्रमुख उपनद्या :

  • डाव्या (उत्तरेकडील) : रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा,
  • उजव्या (दक्षिणेकडील) : यमुना, शोण (गंगेच्या सुमारे 115 उपनद्या आहेत.)
  • गोमती, घागरा, गंडक, कोसी या उपनद्या गंगा-यमुना संगमाच्या आधी गंगेस मिळतात. यांच्या गाळामुळे पंखाकृती मैदाने तयार होतात. शोण नदी दक्षिणेकडून वाहत येऊन बिहार राज्यात गंगेस मिळते. बंगालच्या उपसागरास मिळताना गंगेच्या मुखाशी मोठा त्रिभूज प्रदेश निर्माण झाला असून असंख्य वितरिकांमध्ये तिचे पाणी विभागले जाते. गंगा खोऱ्याचा विस्तार देशातील 10 राज्यांत झालेला आहे. सतत पात्र बदलणाऱ्या गंगेच्या
  • उपनद्या : घागरा, गंडक, कोसी, शोण (कोसी नदीस ‘बिहारचे दुःखाश्रू’ म्हणतात) गंगेचे खोरे हे देशातील सर्वांत मोठे (प्रथम क्रमांकाचे) खोरे आहे.
  • डिसेंबर 2008 मध्ये भारत सरकारने गंगा नदीस ‘राष्ट्रीय नदी’ म्हणून घोषित केले.

यमुना नदी :

  • (उगम : यम्नोत्री; हिमालय, लांबी : 1376 कि.मी.) ही गंगेची सर्वांत मोठी उपनदी अलाहाबाद येथे गंगेला मिळते. सरस्वती ही गुप्त नदी गंगेला येथेच मिळते.
  • उपनद्या : चंबळ, सिंद, बेटवा, धसान, केन या नद्या माळवा पठारावर उगम पावतात व पुढे यमुनेला मिळतात. चंबळ नदी ही राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वांत मोठी नदी आहे.

ब्रह्मपुत्रा :

  • उगम : मानस सरोवर (तिबेट)
  • लांबी : 2900 कि.मी.,
  • भारतातील लांबी : 885 कि.मी. ‘त्सांगपो’ या नावाने तिबेटमधून वाहणाऱ्या नदीस भारतात अरुणाचल प्रदेशात दिहांग म्हणतात. दिहांग नदीस दिबांग व लोहित या नद्या मिळतात. त्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणून ओळखले जाते.
  • (त्सांगपो म्हणजे शुद्धीकारक : Purifier). ब्रह्मपुत्रा नदी चीन, भारत व बांग्ला देश या तीन देशांतून वाहते. ब्रह्मपुत्रा भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम या ईशान्येकडील राज्यांमधून व बांगला देशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे. ब्रह्मपुत्रा बांगलादेशात बंगालच्या उपसागरास मिळते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही ‘जमुना’ नावे प्रसिद्ध.
  • ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले ‘माजुली’ हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे. ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीतील ‘माराजो‘ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे.
  • आसाममध्ये विध्वंसक महापुरास कारणीभूत ठरत असल्याने ब्रह्मपुत्रेस ‘आसामचे दुःखाश्रु’ म्हणतात.
  • ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या : सुभानशिरी, धानशिरी, जयभोरेली, मानस, तिस्ता, भूरी-दिहिंग, दिसांग, कोपोली, कलाग, दिखू, कामेंग, बेलसिरी, चंपामन, गंगाधर, धारला, दिबू. (तिस्ता ही पूर्वी गंगेची उपनदी होती. 1787 मधील मोठ्या पुरामुळे तिचे पात्र बदलले जाऊन तिस्ता पूर्वेकडे वाहत जाऊन ब्रह्मपुत्रेची उपनदी बनली.)

आणखी माहिती वाचा : भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2


भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या | Indian Plateau (Pinsular) Rivers in Marahi

हिमालयीन नद्यांच्या तुलनेत या नद्या कमी लांबीच्या आहेत. वाहण्याच्या दिशेनुसार या नद्यांचे ४ प्रकार पडतात.

दक्षिण वाहिनी नद्या :

  • लुनी, साबरमती व मही.
  • लुनी व साबरमती : या नद्या वायव्येकडील अरवली पर्वतात उगम पावतात. अरवली पर्वतात पुष्कर दरीत उगम पावणारी ‘लुनी’ ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे. लुनी नदी ‘लवणावरी’ किंवा ‘मिठाची नदी’ म्हणून ओळखली जाते. घग्गर नदीच्या व वाऱ्याच्या अपक्षरणामुळे राजस्थानचा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. घग्गर नदी येथेच लुप्त झाली आहे.
  • मही नदी : (उगम : विंध्य पर्वत) मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातमधून वाहते. या सर्व नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.

उत्तर वाहिनी नद्या :

  • उत्तर भारतीय पठारावरून वाहणाऱ्या चंबळ, शोण, बेटवा, केन या उत्तरवाहिनी नद्या असून त्या बंगालच्या सागरास मिळतात.

पश्चिम वाहिनी नद्या :

  • (नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, शरावती, पेरियार)

नर्मदा :

  • लांबी : 1310 कि.मी.
  • नर्मदा खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : 98,795 चौकिमी.
  • नर्मदा खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक लागतो. (द्वीपकल्पीय पठारात – चौथा क्रमांक)
  • उगम : मैकल टेकड्यांतील अमरकंटक (मध्यप्रदेश).
  • नर्मदा ही सर्वात जास्त लांबीची पश्चिमवाहिनी नदी. नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतून वाहते. नर्मदा पश्चिमेकडे वाहत जाऊन भरूच (भडोच) येथे अरबी समुद्रास मिळते. जबलपूरजवळ भेडाघाट येथे नर्मदेची ‘खोल घळई’ व धुवांधार धबधबा प्रसिद्ध आहे.
  • प्रमुख उपनद्या : शक्कर, दुधी, तवा, बाहनेरा, बंजार, कोलार, हिरण, ओरसांग, शार, कुंडी, मंचक. 3 मे 2017 रोजी मध्य प्रदेश विधानसभेने नर्मदा नदीस मानवी दर्जा देण्यासंबंधी विधेयक संमत केले!!

तापी :

  • लांबी : 730 कि.मी.
  • तापी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : 65,145 चौकिमी.
  • उगम : मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतून वाहते. पश्चिमेकडे वाहत जाऊन सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते.
  • उपनद्या : उत्तर पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, अंभोरा, बोरी, खुरसी, गोगाई, बोकड, अणेर, अमरावती, अरुणावती, बेतूल, गंजाल.

शरावती : पश्चिमवाहिनी नदी.

  • उगम : तीर्थहळ्ळी (जि. शिमोगा, कर्नाटक).
  • लांबी : १२८ किमी. संपूर्ण कर्नाटकात वाहते व अरबी समुद्रास मिळते. ‘जोग’चा धबधबा (गिरसप्पा धबधबा) शरावती नदीवर आहे.

पूर्व वाहिनी नद्या :

दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी, कृष्णा, महानदी, पेन्नेरू, कावेरी. पूर्व वाहिनी नद्या त्यांच्या एखाद्या मुख्य नदीस व मुख्य नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात.

गोदावरी :

  • गोदावरी खोऱ्याचा संपूर्ण भारतात गंगाखोऱ्याखालोखाल दुसरा क्रमांक. गोदावरी खोऱ्याने संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या सुमारे ९9.51 टक्के तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या क्षेत्राच्या सुमारे 49% क्षेत्र व्यापलेले आहे.
  • गोदावरीचा उगम : त्र्यंबकेश्वर ‘ब्रह्मगिरी’ (जि. नाशिक)
  • गोदावरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : 3,12,812 चौकिमी.
  • महाराष्ट्रातील क्षेत्र : 1,52,199 चौकिमी.
  • द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील सर्वाधिक लांबीची नदी (प्रथम क्रमांक)
  • गोदावरीची भारतातील एकूण लांबी : 1465 कि.मी. (विश्वकोशानुसार 1498 किमी)
  • गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी : 668 किमी. (काही संदर्भग्रंथात महाराष्ट्रातील लांबी 732 किमी आढळते) गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या तीन राज्यातून व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातून वाहते. गोदावरी खोरे भारतातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा व कर्नाटक ही 7 घटकराज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विस्तारले आहे. (सर्वाधिक विस्तार : महाराष्ट्र, सर्वात कमी : कर्नाटक) आंध्र प्रदेशात राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते.
  • इतर नावे : ‘वृद्धगंगा’, ‘दक्षिण गंगा’
  • प्रमुख उपनद्या : दारणा, प्रवरा, मुळा, सिंधफणस, बिंदूसरा, मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, शबरी.
  • गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प यशस्वी : 16 सप्टेंबर 2015 रोजी आंध्र प्रदेशात गोदावरीच्या पोलावरम उजव्या बोगद्यातून कृष्णा नदीस 80TMC पाणी सोडण्यात आले.

कृष्णा :

  • (कृष्णा खोरे : संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक, द्वीपकल्पीय पठारावर दुसरा क्रमांक)
  • उगम : महाराष्ट्रातील ‘महाबळेश्वर’ (जि. सातारा) .
  •  एकूण लांबी : 1400 कि.मी.
  • महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यांतून वाहते.
  •  कृष्णेचे देशातील क्षेत्रफळ : 2,58,948 चौकिमी.
  • आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरास मिळते.
  • प्रमुख उपनद्या : कोयना, वारणा, वेण्णा, वेरळा, पंचगंगा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा, मुशी, मुन्नेरू

महानदी :

  • देशातील चौथ्या क्रमांकाचे व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे खोरे.
  • उगम : छत्तीसगढमधील रायपूर जिल्ह्यात.
  • एकूण लांबी : 858 कि.मी. (ओडिशा राज्यातील सर्वांत मोठी नदी)
  • पूर्व घाटात महानदी पात्रात ‘सत्कोसिया’ घळई निर्माण झाली आहे.
  • महानदी खोऱ्याचे क्षेत्र : 1,41,600 चौकिमी.
  • ओडिशातील कटक येथे बंगालच्या उपसागरास मिळते.
  • उपनद्या : हिराकूड, ईब, ओंग, मांद, तेल, शिवनाथ.

कावेरी :

  • पश्चिम घाटात कर्नाटकातील कूर्ग (कोडूगू) जिल्ह्यात ‘ब्रह्मगिरी’ येथे
  • उगम : नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात चौथा क्रमांक लागतो.
  • विस्तार : लांबी 765 कि.मी. (कर्नाटक, तामिळनाडू या दोन राज्यांतून वाहते.)
  • तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागरास मिळते.
  • कावेरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : 87,900 चौकिमी.
  • गोदावरीप्रमाणेच कावेरी नदीलादेखील ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखले जाते. ‘शिवसमुद्रम’ (कर्नाटक) हा प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झाला आहे.
  • प्रमुख उपनद्या : हेमवती, हेरांगी, शिमसा, लक्ष्मणतीर्थ, काबनी, भवानी, लोकपावनी, अर्कावती, सुवर्णावती, अमरावती इ. कावेरी नदीची 90% क्षमता जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी वापरली जाते.

नद्यांना मानवी दर्जा :

20 मार्च 2017 रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा व यमुना या दोन मोठ्या नद्यांना मानवी दर्जा (Living Human Status) बहाल केला होता. त्यामुळे या नद्यांना सर्वसामान्य भारतीय नागरिकांप्रमाणे हक्क प्राप्त होऊन त्यांना प्रदूषित केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार होता. 7 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या वरील आदेशास स्थगिती दिली. यापूर्वी न्यूझीलंड देशाच्या संसदेने तेथील ‘व्हांगनुई नदीस मानवी दर्जा दिला होता.


आणखी माहिती वाचा : भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5


भारतातील प्रमुख नद्या  | Major rivers of India in Marathi

  • पश्चिम वाहिनी नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रांगांमधून वाहते.
  • सातपुड्याच्या दक्षिणेस तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
  • पूर्ववाहिनी गोदावरी नदी, उत्तरेकडील सातमाळा-अजिंठा व दक्षिणेकडील हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगांदरम्यान वाहते.
  • हरिश्चंद्र-बालाघाट व महादेव डोंगररांगांदरम्यान भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते.
  • भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान महादेव डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
  • सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्र-बालाघाट, महादेव या डोंगररांगा सह्याद्रीच्या (पूर्वेकडील) उपरांगा आहेत.

भारतातील क्षेत्रफळानुसार नदी खोऱ्यांचा क्रम | Area-wise order of river basins in India in Marathi

नदीखोरेक्रमांकभारतातील क्षेत्रफळ चौ.किमी 
गंगा नदीखोरेसर्वात मोठे व प्रथम क्रमांकाचे खोरे8,61,452 (26.2%)
गोदावरी खोरेभारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे3,12,812 (9.51%)
कृष्णा खोरेतिसऱ्या क्रमांकाचे खोरे2,58,948 (7.87%)
महानदी खोरेचौथ्या क्रमांकाचे खोरे1,41,600 (4.3%)
नर्मदा खोरेपाचव्या क्रमांकाचे खोरे98,715 (3.005%)
कावेरी खोरेपाचव्या क्रमांकाचे खोरे87,900 (2.67%)

गोदावरी नदीचे खोरे 7 राज्यातून पसरलेले आहे :

  • महाराष्ट्र : 1,52,199 चौकिमी:
  • आंध्र प्रदेश : 73,201 चौकिमी;
  • तेलंगणा : 73,201चौकिमी;
  • छत्तीसगढ़ : 33,434 चौकिमी;
  • मध्य प्रदेश : 31,821 चौकिमी;
  • ओडिशा : 17,752 चौकिमी;
  • कर्नाटक : 4,406 चौकिमी.
  • काली नदी भारतात ‘शारदा नदी’ या नावे ओळखली जाते.
  • मही, चंबळ, बेटवा या नद्या माळवा पठारात उगम पावतात.
  • ‘शोण-नर्मदा’ ही मध्यवर्ती उच्चभूमी व दख्खनचे पठार यांच्यातील प्राकृतिक सीमारेषा आहे.
  • विंध्याचल-बाघेलखंड हा टोन्स, शोण व त्यांच्या उपनद्यांचा प्रदेश आहे.

भारतातील प्रमुख नद्या व त्या ज्या राज्यांमधून वाहतात त्यांची नावे आणि संख्या | Names and numbers of major rivers in India and the states through which they flow in Marathi

नदीराज्य व देशांची नावे राज्यांची संख्या
गंगाउत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार,झारखंड,पश्चिम बंगाल व बांग्लादेश5
ब्रह्मपुत्राअरुणाचल प्रदेश,आसाम,व बांग्लादेश, चीन2
सिंधूजम्मू-काश्मीर,व पाकिस्तान, चीन1
नर्मदामध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात3
तापीमध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात3
गोदावरीमहाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश व पुदुच्चेरी3
कृष्णामहाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश4
कावेरीकर्नाटक, तामिळनाडू2
महानदीछत्तीसगढ, ओडिशा2
महीमध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात3
साबरमतीराजस्थान, गुजरात2
चंबळमध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश3

भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावर वसलेली शहरे | Major Rivers of India and Cities Located on their Banks in Marathi

नदीशहरे
गंगाहरिद्वार, कानपूर, पटणा, मिर्झापुर, बनारस, भागलपूर, बक्सार
महानदीकटक, सबळपूर
नर्मदाजबलपूर, देवास, राजपिपला
यमुनादिल्ली, आग्रा, मथुरा
चंबळकोटा
ब्रह्मपुत्रादिब्रुगड, गुवाहाटी, गोलापारा
शरयू  (घाग्रा)अयोध्या
गोमतीलखनौ
साबरमतीअहमदाबाद
मुशीहैदराबाद
तापीसुरत, भुसावळ
गोदावरीनाशिक, पैठण, कोपरगाव
कावेरीश्रीरंगपट्टणम्, तीरुचीरापल्ली
सतलजफिरोजपूर, लुधियाना
हुगळीकोलकाता, हावडा
झेलमश्रीनगर
पेरियारअलवाए
सुवर्णरेखाजमशेदपूर
क्षिप्राउज्जैन
गंगा, यमुना, सरस्वती (त्रिवेणी संगम)अलाहाबाद

 

आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*