भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4

Indian Islands Information in Marathi

भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती

Indian Islands Information in Marathi

Indian Islands Information in Marathi : भारतीय सागरी बेटात अनेक  बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार बेटसमूहात अनेक बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात 36 बेटे आहेत. -देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांची विभागणी अरबी समुद्रातील बेटे व बंगालच्या उपसागरातील बेटे अशी केली जाते. मुख्य भूमीपासून अलग असलेली बेटे ही देशाच्या प्राकृतिक रचनेचाच एक भाग आहेत.

अरबी समुद्रातील बेटे  | Islands in the Arabian Sea Information in Marathi

लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे  | Lakshadweep, Minicoy and Amindivi Islands

लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे ही प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत. लक्षद्वीप, मालदीव व छागोस द्वीपसमूह ही अरबी समुद्रातील बेटे म्हणजे जलमग्न पर्वतीय रांगेचे अतिउत्तरेकडील भाग आहेत. ‘लक्षद्वीप’ याचा शब्दशः अर्थ ‘एक लाख बेटे’ असा असला तरी प्रत्यक्षात अरबी समुद्रातील या द्वीपसमूहात केवळ 36 बेटांचा किंवा शैलभित्तीचा समूह आढळतो.

अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वतांच्या शिखरांभोवती कीटकांच्या संचयनामुळे निर्मिती झालेल्या बेटांना प्रवाळ बेटे म्हणतात. लक्षद्वीप बेटे ही या बेटांचाच भाग असल्याने ती ज्वालामुखी निर्मित बेटे आहेत, असे मानले जाते. येथे डोंगर अथवा नदी आढळत नाही. लक्षद्वीप बेटसमूहात मिनीकॉय, कावरती, लखदीव, अमिनी, किलतान, कादमत इत्यादी बेटांचा समावेश होतो. लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ 32 चौ. किमी असून तो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.

लक्षद्वीपमधील एकमेव विमानतळ ‘अगाती विमानतळ’ हा मुख्यभूमीवर केरळमधील कोची या शहरास जोडला गेला आहे. लक्षद्वीप परिसरात स्कूबा डायव्हिंग, विंडसर्किंग, वॉटरस्किइंग इत्यादी जलक्रीडांच्या माध्यमातून हा परिसर पर्यटकांचे आकर्षणस्थान बनविण्यात आला आहे. कॅनेनोर बेटे व अमीनीदिवी बेटे ही लक्षद्वीप बेटांचेच भाग आहेत.


आणखी माहिती वाचा :  भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1


बंगालच्या उपसागरातील बेटे  | Bay of Bengal Islands Information in Marathi

अंदमान-निकोबार बेटे | Andaman and Nicobar Islands

बंगालच्या उपसागरातील बेटे ही समुद्रात बुडालेल्या ‘आव्हाकानयोमा’ या पर्वताची शिखरे आहेत. उदा. अंदमान आणि निकोबार बेटसमूह (जगातील सर्वांत मोठा बेटसमूह)

अंदमान बेटाचे मोठे अंदमान व लहान अंदमान असे दोन भाग आहेत. मोठे अंदमानचे उत्तर, मध्य व दक्षिण अंदमान असे भाग आहेत.

दहा अक्षांश खाडीच्या दक्षिणेकडील निकोबार हा २२ बेटांचा समूह असून त्यातील 10 बेटांवर मानवी वस्ती आहे. अंदमान-निकोबारची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर मुख्य भूमीशी चेन्नई, विशाखापट्टणम व कोलकाता या शहरांना जोडलेले आहे.

अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हा एकमेव विमानतळ आहे. अंदमान-निकोबारमध्ये लक्षद्वीपच्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोर्ट ब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटांपुरतेच मर्यादित आहे, कारण या बेटसमूहातील कमी होत चाललेल्या आदिवासी जमातींना संरक्षण देणे हे सरकारने मुख्य ध्येय मानले आहे. अंदमान बेटसमूहात प्रवाळ बेटे आढळत नाहीत.

भारतातील अन्य बेटे | Other Islands of India Information in Marathi

  • भारतात समुद्रातील सुमारे 1382 बेटे आहेत. (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स, 22 सप्टेंबर 2016) .
  • बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर ‘अवसादी बेटे’ आहेत.
  • कच्छच्या आखातात झालरीसदृश्य प्रवाळांच्या शैलभित्तींच्या स्वरूपातील बेटे आहेत.
  • कोकण व मलबार किनाऱ्यालगत छोटी बेटे आढळतात.
  • न्यू-मुरे : हे बंगालच्या उपसागरातील बेट (हरिभंगा नदीलगत) भारताच्या मालकीचे आहे. या बेटावरून भारत व बांगला देश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे.
  • Barrier Island : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वाळूच्या संचयनाने श्रीहरिकोटा हे Barrier Island तयार झाले आहे.

आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*