भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती
History of India in Marathi : मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती, आपण ह्या आधी बरेसे माहिती घेतली आहे, आज आपण भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारताच्या इतिहासाला जागतिक इतिहासातील एक महान अध्याय म्हटले तर अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. त्याचे वर्णन करताना, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, “विरोधाभासांनी भरलेले परंतु मजबूत अदृश्य धाग्यांनी बांधलेले”. भारतीय इतिहासाचे वैशिष्ट्य हे आहे की तो आत्मशोधाच्या अखंड प्रक्रियेत गुंतलेला आहे आणि वाढतच चालला आहे, म्हणूनच हे सर्व एकाच वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ते मायावी वाटते.
भारताचा ऐतिहासिक कालखंड तीन भागात विभागला गेला आहे :
- प्राचीन भारताचा इतिहास
- मध्ययुगीन भारताचा इतिहास
- आधुनिक भारताचा इतिहास
प्राचीन भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of Ancient India in Marathi
प्राचीन भारताचा इतिहास भारतातील प्राचीन आर्य राजांची राजकीय व्यवस्था उदयापासूनचा इतिहास आर्य राजघराण्यांच्या अंतापर्यंतचा समावेश आहे, ज्यांना प्राचीन भारतीय क्षत्रिय म्हणतात. त्याचा कालावधी सुमारे ३००० ईसापूर्व ते इसवी सन १२०६ पर्यंत निर्धारित केला जातो. म्हणजेच या कालखंडाचा शेवट भारतात मुस्लिम राजवटीच्या स्थापनेने होतो.
प्राचीन काळामध्ये भारतात एकाच वेळी निरनिराळ्या भागांमध्ये वेगवेगळी संस्कृती असलेले वेगवेगळे समाज राहत होते. भारत हि प्राचीन संस्कृतीची भूमी मानली जाते शेकडो वर्षांपासुन भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृती नांदत आल्या आहेत. प्रगितिहास एक असा काळ ज्यामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन समाजांची व त्यांच्या जीवनाची माहिती फक्त त्यांच्या भौतिक अवशेषांवरूनच माहिती पडते कारण त्या काळात त्यांना लेखन विद्या परीचयास आली नव्हती.
प्रगितिहास हा एक असा कालखंड होता जेव्हा मनुष्याला धातूंची माहिती किंवा त्यांचा उपयोग कसा होतो हे ठाऊक नव्हतं म्हणूनच आपल्या उपजीविकेसाठी त्याला खडे, हाडे व विशेष करुन दगड यांचा वापर केला. व हा काळ अश्मयुग म्हणुन नावाजला जातो. या कालखंडाचे देखील पुढे वेगवेगळे भाग तयार झाले जसे की पुराश्मयुग, मध्य अश्मयुग, नवाश्मयुग, आणि ताम्रपाषाणयुग. अश्मयुगामध्ये आकाराने मोठी असलेली हात कुऱ्हाड व यांच्याशीच मिळतीजुळती अशी धार असलेली हत्यारे वापरली जायची. त्या काळातील मानव जीवन प्रामुख्याने कंदमुळे, फळे किंवा एखाद्या प्राण्याची शिकार करुन त्यांच्या मांसावर जगत होता.
त्यावेळी मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमण करायचा. त्यांनी तयार केलेली दगडी आयुधे भारतातील सर्व महत्त्वाच्या जलौघांच्या काठी सापडली गेली आहेत. अश्मस्थीही गोदावरी, नर्मदा अशा काही नदीच्या काठी मिळालेल्या आहेत परंतु त्या काळातील मानवाचे शरीराचे अवशेष अजुनही सापडले नाही आहेत.
पुढच्या काळामध्ये पुराणाश्मयुग होता ज्यामध्ये आधीच्या अश्मयुगीन हत्यारे यांमध्ये व पुराणाश्मयुगातील हत्यारांमध्ये फरक दिसून आला. यावेळी हत्यारे आकाराने लहान व गारगोटी यासारख्या दगडांच्या माध्यमातून बनवण्यात आली. हि हत्यारे हाडांच्या किंवा लाकडाच्या खोबणीत बसवून वापरली जात होती.
उत्तर पुराणाश्मयुगात हत्यारांचा वापरामध्ये अजुन बदल घडून आला. छोट्या छिन्न्या, कोरके, गारगोटीची धारदार पती अशा हत्यारांचा उपयोग जास्त प्रमाणात होऊ लागला. अगदी लहान आकाराची गारगोटीची पाती, टोचे, बाणासारखी टोके इत्यादी हत्यारे मध्य अश्मयुगामध्ये वापरण्यात आली. या कालखंडाचे पुरावे देणारी काही अवशेष सुरवातीला गुजरात आणि पुढे उत्तर प्रदेश मध्ये आढळून आले. या काळातील माणसांचे सांगाडे हि येथे मिळाले आणि त्यावरून केलेल्या संशोधनानुसार इ.स.पू. 5000 ते 2000 हा काळ मध्यअश्मयुग म्हणुन ओळखला जातो.
नवाश्मयुग हा काळ विकसित काळ होता. बाकीच्या समाजाच्या तुलनेत या काळामध्ये हत्यारे घासून व गुळगुळीत करुन त्यांचा वापर केला गेला आणि काही तांब्याच्या व ब्राँझच्या धातूंचा वापर होण्यास सुरवात झाली. संशोधनावरून असे आढळून आले आहे की कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, बंगाल मधील काही भाग इत्यादी भागांमध्ये या काळातील वस्त्या आढळून आल्या आहेत.या काळामध्ये मानवाला कृषिविद्या इत्यादींचा शोध लागला आणि त्यांची वस्ती अजून स्थिर झाली आता या काळातील माणूस अन्न संकलन नव्हे तर अन्न उत्पादक बनला.
पुढे ताम्रपाषाण युग हा काळ सुरु झाला यामध्ये मानव वस्ती, मानव जीवन अधिक सुरळीत झालं. विकसित धातूचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. या काळामध्ये व नवाश्मयुग काळामध्ये घरदार यांची रचना, वसाहतींची आखणी, मृत पात्रांची घडण करण्याची पद्धत, मृतांची विल्हेवाट लावण्याची पद्धती, पूजा पद्धती, पूजनीय वस्तू यांमध्ये साम्यता आढळून आली. या काळामध्ये तांब्याच्या व ब्रांचच्या आयुधांचा वापर सर्वाधिक केला गेला.
इ.स.पू. 1400 ते इ.स.पू. 700 या दरम्यान या संस्कृतीचा सर्वाधिक प्रसार कर्नाटकातील उत्तर भाग, पश्चिम भाग, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागांमध्ये दिसून आला. भारताचा खरा इतिहास हा सिंधू संस्कृती व आर्य समाज इथून सुरु झाला. या दोन टप्प्यापासून भारताचा सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रादेशिक विस्तार होत गेला. सिंधू संस्कृती व आर्य समाज हे दोन टप्पे पूर्व वैदिक आणि वैदिक युग म्हणुन नावाजले जातात. वैदिक काळामध्ये हिंदू धर्माचा उदय झाला.
सिंधू संस्कृती आणि आर्य समाज यांच्या आगमनापासून भारताच्या इतिहासाला सुरवात झाली पूर्व वैदिक आणि वैदिक कालखंड म्हनून हे दोन कालखंड वर्णली जातात. ऋगवेद हे प्राचीन साहित्यिक स्त्रोत भारताच्या भूत्कालाबाद्द्ल सर्वात जास्त माहिती देत. सिंधू संस्कृती हि आधीच्या समाजापेक्षा जास्त स्थिर आणि प्रगत मानली जाते. या काळामध्ये आर्थिक व्यवस्था भरभराटीची होती.
सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून साधने आणि शस्त्रे बनवत असत इथूनच मध्यपूर्व देशांशी व्यापाराला हि सुरवात झाली. या काळामध्ये पुराऑस्ट्रेलॅइड, भूमध्यसमुद्रीय, मंगोलॅइड,अल्पिनाइड हे चार मानववंशाचे वर्ग आढळून आले. सोबतच आशिया खंडातील वेगवेगळे लोक देखील भारतामध्ये येऊन स्थायिक झाले कारण भारतामध्ये सुबत्ता व शांती होती. या काळामध्ये ऑस्ट्रिक, चिनी-तिबेटी, द्राविड, इंडो-युरोपीय ही चार भाषाकुले आढळून आली. या काळामध्ये मानवजातीला उपयुक्त ठरतील अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागला जसं की कुदळ, फावडे, दांडके यांचा उपयोग जमिनीच्या मशागती करता करण्यात आला.
मातीची भांडी, लहान नौका, फुंकणी इत्यादी सोबतच पाले भाज्या, फळफळावळ, सुपारी, नारळ, उसाची लागवड, उसाची साखर काढणे, कापसाचे कापड तयार करणे, हत्ती पाळणे इत्यादी गोष्टी मानवाने शोधून काढले आणि पुढे भूमध्यसमुद्रीय मानववंशांनी भारतामध्ये नागर संस्कृतीची स्थापना केली आणि सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय व्यापार ही त्यांनीच सुरु कला आहे. हे द्राविडी भाषिक लोक होते. ही भाषा उत्तर, पश्चिम, पूर्व व मध्य भारतातही पसरली आहे.
सिंधू कुळातील सर्वात प्रसिद्ध शहरे म्हणजे हडप्पा व मोहेंजोदडो होय. यामुळे सिंधू खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर शेती करने शक्य झाले. सिंधू संस्कृतीची लोक सुनियोजित शहरांमध्ये आणि भाजलेल्या विटांनी बनवलेल्या सुसज्ज घरांमध्ये राहायचे. सिंधू संस्कृतीचे उत्तम दाखले देणारे अवशेष हडप्पा व मोहेंजोदडो येथे सापडले आहेत. भारताने पाहिलेल्या पुढील काळ म्हणजे वैदिक संस्कृतीचा काळ. जो सरस्वती नदीच्या काठी भरभराटीला आला त्याला वेदांचे नाव देण्यात आले त्यात हिंदुच्या सुरवातीच्या साहित्याचे चित्रण केले गेले.
या काळातील दोन महान महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत होय. जी आजही हिंदू धर्माच्या अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात आदराने पाळली जातात. या काळाबद्दल सांगायचं झालं तर या काळामध्ये नॉर्डिक मानववंश आढळून आले नॉर्डिक म्हणजे वैदिक आर्य इ.स.पू. 1500 मध्ये भारतात आले. वैदिक आर्याच्या आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचा नाश झाला असे मानले जाते. ते आक्रमण व लुटारू प्रवृत्तीचे होते. वैदिक आर्य समाजाचे लोक संस्कृत भाषिक होते. ते भारताबाहेरील लोक होते भारतामध्ये येऊन स्थायिक झाले असे काही पश्चिम विद्वानांचे मत आहे.
सुरवातीस त्यांचे वास्तव्य हिंदू खोऱ्याच्या वरच्या प्रदेशांमध्ये होतं परंतु नंतर पंजाब, राजस्थान, गंगेचा वरचा भाग इथेही या वंशाचे लोक रुळले. आर्य समाजाची लोक अश्व प्रेमी होते. त्यांना अश्वरथ व अश्वारोहणाची कला अवगत होती. अश्वारूढ दले व अश्व रथ दले याच्या ताकदीवर आर्य समाजाच्या लोकांनी अर्योतरांवर विजय प्राप्त केला. रुग्ण वेदातील आर्यांनी हल्ले करुन दस्यू, दास व पणि या अर्येतरांचे पशुधन, अन्न, सुवर्ण, क्षेत्र, स्त्रिया मुले व माणसे लुटणे हा त्यांचा व्यवसाय होता.
सिंधू संस्कृती व आर्यसमाज यांनतर भारतामध्ये बौद्ध युग उदयास आले. सातव्या व सहाव्या शतकामध्ये जैन तीर्थकर महावीर आणि गौतम बुद्ध या धर्म संस्थापकांचा उदय झाला. बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम होते यांचा जन्म कपिलवस्तू जवळ लुंबिनी येथे झाला ते बौद्ध धर्माचे संस्थापक होते. हा धर्म अध्यात्मावादावर आधारित आहे. आणि आज जगभरात त्यांच्या शिकवणीचे पालन केले जाते.
हे शतक वेदकालाचे अखेरच शतक मानलं जातं. उत्तर हिंदुस्थानामध्ये काही महाजनपदे स्थापन झाली होती जैन व बौद्ध वाड्मयात यापैकी सोळा महाजन पदे सर्वात शक्तिशाली ठरली व त्यांचे विशेष उल्लेख देखील सापडतात. उत्तर हिंदुस्थानांत मध्ये ऐतिहासिक गोष्टींची सुरुवात चौथ्या शतकापासून सुरू झाली. सहाव्या शतकामध्ये मगध देशात नंद वंशाचे राज्य होते जे सर्वात शक्तिशाली व बलाढ्य मानले जायचे. समृद्ध शेतीमुळे नंद वंशाच्या राज्याची भरभराट झाली.
अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले त्याने भारताची सिंधू नदी ओलांडली आणि भारतीय राज्यकर्त्यांचा युद्धात पराभव केला. पुढे त्याने पराभूत राज्यांच्या जमिनीचा ताबा घेतला. भारताच्या वायव्य भागावर आक्रमण केलं तोबियास नदीपर्यंत पोहोचला परंतु नंद सेनेच्या सामर्थ्याचे वर्णन ऐकून त्यांनी आपल्या सैनिकांना आक्रमण करण्यास नकार दिला नंद राजवट त्यावेळी इतकी बलाढ्य होती की अलेक्झांडर यांच्यासारखा योद्धा परत माघारी गेला.
मगध साम्राज्याचा विस्तार पुढे मौर्य वंशाने चालवला. चंद्रगुप्त मौर्या यांचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून नावाजला जातो. त्यांनी लिच्छविस सरदाराच्या मुलीशी लग्न केलं आणि पाटलीपुत्र ची भेट हुंड्यात मिळवली त्यावेळी त्यांनी गंगा नदीपासून अलाहाबाद शहरापर्यंत विस्तारलेल्या आपल्या साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली १५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना साम्राज्य विस्तारासाठी व भारताच्या भरभराटीसाठी राजांचा राजा म्हणून संबोधले जाते.
मौर्य साम्राज्याचा विस्तार पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बिंदुसार यांच्या आधिपत्याखाली सुरू राहिला. पुढे अशोक सम्राट यांच राज्य सुरू झालं त्यांच्या आधी मौर्य साम्राज्याचा विस्तार कर्नाटका पर्यंत पोहोचला होता पुढे अशोक सम्राट याने कलिंग देशावर आक्रमण करून तो प्रांत जिंकला. ते बौद्ध धर्माचे अनुयायी होते त्यामुळे त्यांच्या साम्राज्यावर देखील बौद्ध धर्माची छाप होती. अशोक सम्राट यानंतर अनेक वेगवेगळ्या राजवटी स्थापन झाल्या भारतातील शेवटचे प्राचीन राज्य ही राजा हर्षवर्धन यांचे होते जे आपल्या भावाच्या मृत्यूनंतर तन्नेशवर आणि कन्नोज येथील गादी मिळवली.
काही प्रांतांवर विजय मिळवून शेवटी भारताच्या दख्खनच्या चालुक्य साम्राज्य कडून त्यांचा पराभव झाला. ते उच्च धार्मिक सहिष्णुता आणि मजबूत प्रशासनासाठी प्रसिद्ध होते.
आणखी माहिती वाचा : भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
मध्ययुगीन भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of Medieval India in Marathi
मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सन १२०६ मध्ये दिल्ली सल्तनतच्या स्थापनेपासून ते १७६१ च्या पानिपतच्या लढाईपर्यंतचा आहे. या संपूर्ण काळात तुर्कांनी भारतावर सुमारे ३०० वर्षे आणि मुघलांचे राज्य सुमारे २५० वर्षे चालवले, परंतु इसवी सन १७६१ पर्यंत ते इतके कमकुवत झाले की पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी मुघलांच्या वतीने अहमद शाह अब्दालीशी लढा दिला. . मराठ्यांच्या दारुण पराभवानंतर मुघल राजवट पूर्णपणे अस्ताचलकडे जाते आणि इंग्रजांना त्यांची शक्ती वाढवण्याची संधी मिळते.
मध्ययुगीन भारताचा इतिहास बद्दल सांगायचं झालं तर भारताचा मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य मधून त्याच्या अनेक वैशिष्ट्यं साठी प्रसिद्ध आहे जवळ जवळ तीन पिढ्यांपर्यंत विस्तारलेल्या मध्ययुगीन भारतामध्ये अनेक राज्ये आणि राजवंशांचा समावेश आहे.
त्यातीलच काही म्हणजे चालुक्य, पल्लव, पंड्या, राष्ट्रकूट, चोळ. नव्या शतकामध्ये त्यावेळी सर्वात महत्वाचे राज्यकर्ते म्हणून चोळ राजवट नावाजले जात होते त्यांच्या राज्यामध्ये श्रीलंका आणि मालदीव सहा दक्षिण भारताचा मोठा भाग व्यापलेला होता त्यावेळेस चोळ शासकांनी शौर्याने राज्य केले आणि त्यामुळे भारतातील अनेक प्रदेश त्यांच्या ताब्यात होते तर चोळ राजवटीचा अंत १४ व्या शतकात झाला. परंतु या राजवटीतील स्मारके अजूनही पहायला मिळतात जे त्यांच्या साधेपणा साठी ओळखली जातात.
मोगलांचे साम्राज्य सुरू झालं आणि इस्लामिक राज्यकर्त्यांचा उदय झाला. सोळाव्या शतकामध्ये मोगल साम्राज्याचा उदय होऊ लागला भारतातील सर्वात महान साम्राज्यं पैकी एक होतं. मोगल साम्राज्य एक श्रीमंत आणि वैभवशाली साम्राज्य म्हणून ओळखलं जायचं. मुघल राजे म्हणजे बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब.
भारतात आज मोगल काळापासून अनेक स्मारके अस्तित्वात आहेत शेवटचा मुघल राजा औरंगजेब होता याच्या मृत्युने भारतात विघटनाची बीजे पेरली गेली. पुढे सम्राट अकबर मोगल साम्राज्याचा बाबर आणि हुमायून नंतरचा तिसरा सम्राट होता ज्याने फक्त तेरा वर्षाचे असताना साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. शहाजहान हा बाबर, हुमायून, अकबर आणि जहांगीर यांच्यानंतर चा पाचवा मुगल शासक होता जो भारतीय उपखंडामध्ये १६२८ ते १६५८ पर्यंत राज्य केले.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य सुरू झाले छत्रपती शिवाजी महाराज हे पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं ते त्यांच्या काळातील एक महान योद्धा म्हणून नावाजले जायचे. शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोलकोंडा ची सल्तनत, विजापूरची सल्तनत आणि युरोपियन वसाहतवादींशी युक्ती आणि शत्रुत्व स्वीकारले. शिवाजी महाराजांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार झाला ते फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कथा त्यांचे पराक्रम आजही लोककथेच्या माध्यमातून लोकांना सांगितले जातात. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले त्यांच्या काळात देखील मराठी साम्राज्याचा विस्तार भरभराटीस आला पुढे त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची घडी विस्कटली परंतु पुढे पेशव्यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार पुन्हा भरभराटीस आला.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव होऊन मराठी सत्तेची प्रतिष्ठा संपली. मराठ्यांचा दरारा नाहीसा झाला. अशा परिस्थितीत माधवराव पेशवा झाला. मराठ्यांच्या इतिहासात माधवराव पेशव्यांचा काळ अनेक दृष्टींनी उज्ज्वल व क्रांतिकारक मानला जातो. पानिपतावर मराठ्यांची गेलेली पत त्यांनी परत प्राप्त केली. अनेक लढाया जिंकल्या. त्यांच्यानंतर नारायणराव पेशवा झाला. नारायणरावाने रायगड किल्ला जिंकला, त्यांच्या वधानंतर परत अस्थिरता निर्माण झाली. यानंतर मराठ्यांत बंडाळी माजली. त्याचा फायदा इंग्रजांनी उठवला. अठराव्या शतकाच्या शेवटी इंग्रजांनी स्वतःला भारतातील एक प्रबळ सत्ता म्हणून घोषित केले.
आधुनिक भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of Modern India in Marathi
इ.स. १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहात, मुघल सम्राटाला पेन्शन देण्यात आली आणि ब्रिटीश भारताचे वास्तविक शासक बनले. अशा प्रकारे इसवी सन १७६१ ते १९४७ या कालखंडाला आधुनिक भारताचा इतिहास म्हटले जाते.
अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातील मोठा प्रदेश हळू ब्रिटिश सरकारच्या वतीने सार्वभौम सत्ता म्हणून काम करणाऱ्या इस्ट इंडिया कंपनीच्या कंपनीने जोडला गेला. भारता वरती ब्रिटिशांचे राज्य सुरू झालं. भारतामध्ये ब्रिटिश राजवट सुरू झाली. जवळपास ब्रिटिशांनी भारतामध्ये दोन शतक राज्य केलं. संपूर्ण भारताचा कारभार दोन शतके ब्रिटिशांच्या हाती होता. त्यांनी देशाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय निर्णय घेतले. त्यांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाचा वापर केला.
त्यांनी भारताची संपत्ती लुटली कापूस, मसाले, रेशीम, चहा यासह इतर अनेक संसाधने त्यांनी घेतली. ब्रिटिश राजवटीने धर्माच्या आधारावर भारतीयांमध्ये फूट पाडली आणि भारतीयांना एकमेकांच्या विरोधात केलं. मजुरांशी गैरवर्तन केलं. भारतीयांना ब्रिटिश राजवटीचा गुलाम बनवलं. आणि याच कारणास्तव स्वातंत्र्य हव म्हणून भारतातील सर्व बांधव एकत्रित आले आणि प्रमुख स्वातंत्र्यसैनिक आघाडीवर आले.
पहिल्या महायुद्धानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्वातंत्र्यासाठी देशव्यापी लढा सुरू केला महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक क्रांतिवीर स्वातंत्र्य चळवळीत उतरले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात वासुदेव बळवंत फडके यांसारखे देशभक्त पुढे आले आणि नंतर बंगालमध्ये, महाराष्ट्रात व पंजाब आणि सोबतच इतर उत्तर हिंदुस्थानात काही भागांमध्ये स्वातंत्र्यलढा सुरू झाला.
पुढे सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. १४ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे आणि ७ ते ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन भरून छोडो भारत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन १९४६ पर्यंत सुरू राहिले. १ नोव्हेंबर १९४६ रोजी ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांच्या हाती मध्यवर्ती सरकारची सूत्रे सोपवली.
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, तात्या टोपे, नानासाहेब, लाल बहादूर शास्त्री, सुभाष चंद्र बोस, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, विनायक दामोदर सावरकर, दादाभाई नौरोजी, राम प्रसाद बिस्मिल, के एम मुंशी, बिपिन चंद्र पाल, चंद्रशेखर आझाद इत्यादींसारख्या अनेक क्रांतिवीरांचा सहभाग आहे.
हिंदू व मुसलमान या दोन धर्मांमध्ये पुढे तडजोड होऊ लागले आणि भारत व पाकिस्तान अशी हिंदुस्थानची फाळणी करण्यात आली. माउंटबॅटन योजनेखाली फाळणीची प्रक्रिया पार पडली. अखंड भारताची फाळणी झाली १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply