भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5

Climate of India Information in Marathi

भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती

Climate of India Information in Marathi

Climate of India in Marathi : भारताचे हवामान हा हिमालय पर्वत प्रदेशाचा परिणाम असून हवामानदृष्ट्या भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे. भारताचे हवामान ‘मान्सून’ (मोसमी) प्रकारात मोडते. भारताचे एकूण ३६ हवामान विभागांत वर्गीकरण. तापमान वितरण : देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तावर जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे तेथे वर्षभर तापमान अधिक असते. सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते.

उन्हाळ्यात राजस्थानमधील गंगानगर भागात (५०° सें.ग्रे.हून अधिक) देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते. हिवाळ्यात जम्मू-काश्मीर, हिमालयीन पर्वत क्षेत्र येथील तापमान उणे (-) ४०° सें.ग्रे. इतके खाली उतरते.

भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India Information in Marathi

ऋतू : भारतात ऋतूंची विभागणी पुढीलप्रमाणे केलेली आढळते.

उष्ण हवेचा उन्हाळा : मार्च ते मे.

दमट व उष्ण पावसाळी ऋतू : जून ते सप्टेंबर

माघारी मान्सूनचा काळ : ऑक्टोबर ते नोव्हेंबर

थंड व कोरडा हिवाळा : डिसेंबर ते फेब्रुवारी

उन्हाळा (मार्च ते मे) :

  • २१ मार्च रोजी सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
  • भारतात या काळात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते व उन्हाळा सुरू होतो.
  • परिणाम : लू, धुळीची वादळे, नार्वेस्टर, कालबैसाखी.
  • लू : मे-जून महिन्यात उत्तरेकडील पश्चिम मैदानी प्रदेशात वाहणारे अतिउष्ण व कोरडे वारे.
  • नार्वेस्टर : पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उबदार बाष्पयुक्त वारे व वायव्येकडून येणारे उष्ण कोरडे वारे यांच्या संम्मीलनात गडगडाटी वादळांची निर्मिती होते. त्यास ‘नार्वेस्टर’ म्हणतात.
  • कालबैसाखी : गंगेच्या मैदानात पश्चिम बंगालमध्ये मार्च महिन्यात मोसमीपूर्व वाहणाऱ्या उष्ण वादळी हवेच्या प्रवाहांना ‘कालबैसाखी’ म्हणतात. यामुळे धुवांधार पर्जन्यवृष्टी होते.
  • आंबेसरी : उन्हाळ्यातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत पडणारा पाऊस.
  • वसंत वर्षा : पश्चिम बंगाल, आसाममध्ये या पावसास वसंत वर्षा म्हणतात.
  • ब्लॉसम शॉवर्स (फुलांचा वर्षाव) : मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या प्रारंभी केरळ व कर्नाटक राज्यांत पडणारा वादळी पाऊस. हा कॉफी पिकासाठी उपयुक्त असल्याने त्यास ‘कॉफी बहार सरी’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात या पावसास ‘आम्रसरी’ किंवा वळिवाचा पाऊस म्हणतात.

आणखी माहिती वाचा :  भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1


पावसाळा (जून ते सप्टेंबर) :

  • हिंदी महासागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात नियमित पाऊस पडतो.
  • भारतात प्रवेश करताना नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे ‘अरबी समुद्रावरून वाहणारे’ व ‘बंगालच्या उपसागरावरून वाहणारे’ असे दोन प्रकार पडतात, हे वारे भारतात 80 टक्के हून अधिक पाऊस देतात.
  • गंगेच्या मैदानी प्रदेशात 90 टक्के पाऊस बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या शाखेमुळे पडतो.

माघारी मान्सूनचा काळ (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) :

  • 23 सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि उत्तर गोलार्धात तापमान कमी होऊन वायूदाब वाढतो, परिणामी उत्तर भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन ते आग्नेय व दक्षिणेकडे सरकू लागतात. यालाच मान्सूनची माघार असे म्हणतात.
  • ऑक्टोबर उष्मा (October Heat) : सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतात वाहणारे नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरल्यानंतर भारतात ऑक्टोबर महिन्यात सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढून तापमानही वाढते. यास ‘संक्रमण काळ’ असे म्हणतात.

हिवाळा :

  • 22 डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर असतो, त्यावेळी भारतात तापमान कक्षा खाली येऊन कोरडा व थंड हिवाळा सुरू होतो. या काळात ‘ईशान्य मोसमी वारे’ (समुद्राकडे वाहणारे) बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त बनतात.
  • ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे तामिळनाडूच्या मध्य व पूर्व भागात आणि आंध्र प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो.
  • जेट वाऱ्यांचा प्रभाव : हिवाळ्यात जम्मू काश्मिर व हिमाचल प्रदेश या राज्यांत तपांबराच्या वरच्या थरात
  • 20,000 ते 50,000 फूट (सुमारे 11 किमी) उंचीवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या जेट वाऱ्यांमुळे पाऊस पडतो व हिमवृष्टी होते.

आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*