Bharat information in marathi | भारत देशाची संपूर्ण माहिती

bharat information in marathi

Bharat information in marathi | भारत देशाची संपूर्ण माहिती | India Country Information In Marathi | Bharat Information in Marathi

bharat information in marathi

Bharat information in marathi : भारत देशाचे संपूर्ण नाव भारत याचा पूर्ण अर्थ ‘भा’ म्हणजेच ‘तेज‘ व ‘रत’ म्हणजेच ‘ रममाण ‘. म्हणजेच तेजात रममाण झालेला देश म्हणजेच भारत देश असे ओळखला जातो. भारत हया देशाची लोकसंख्या खूप अधिक प्रमाणात असल्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो व क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.

भारताला अनेक प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली असून येथे अनेक थोर संतांची महती ही आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे ज्ञान, आध्यात्म, कला, धर्म या बाबतीत भारताला मोठा वारसा प्राप्त झालेला आहे.

भारतविषयी आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या असल्यास नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून, मुंबई हे सर्वात मोठे शहर आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात जसे मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, कन्नड, काश्मिरी, ओडिसा, असामी, बंगाली, गुजराती, नेपाळी, पंजाबी, भोजपुरी, उर्दू, सिंधी, संस्कृत,संथाळी, मणिपूरी, माल्याळम, तामिळ, डोग्री, तेलगू. भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 असून प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 आहे.

भारतीय संस्कृती ही सिंधु संस्कृती, नागा संस्कृती, हडप्पा संस्कृती यावर आधारलेली आहे.भारतीय स्थापत्य कला ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. येथील ‘ताजमहल’ हे जगातील 7 आश्चर्यपैकी एक आहे. त्याचबरोबर येथील लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, गेट वे ऑफ इंडिया, संसद भवन, मरिन ड्राईव्ह, वांद्रे – वरळी सागरी सेतू हे येथील महत्वाची ठिकाणे आहेत.

भारतीय संगीतात दोन मुख्य प्रकार गणले जातात. भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत. त्याचप्रमाणे येथील शास्त्रीय नृत्य व लोक नृत्याचे काही प्रकार प्रसिद्ध आहेत. जसे लावणी, भंगडा, भरतनाट्यम, कुचिपुडी, कथकली, कथक, मणिपूरी, मोहिनीअट्टम, ओडिसा, सत्रिया, बिहू नृत्य, छाऊ, सबळपुरी व घुमर.

भारतीय संस्कृतीबरोबरच येथील पाककला ही जगप्रसिद्ध आहे. येथील जेवणात विविध प्रकारचे खडे मसाले व अन्य गरम मसाल्यांचा व्यवस्थित वापर करून स्वादिष्ट अश्या पाककृती बनविण्यात येतात जे खूपच चविष्ट असतात. येथील बहुतांश आहार हा मसालेदार असतो परंतु त्याचबरोबर येथील मिठाई व विविध गोड पदार्थ ही जगभरात प्रसिद्ध आहेत.

येथील शाकाहारी जेवणात निरनिराळ्या पालेभाज्या व कडधान्य, डाळी व तांदुळाचा वापर करण्यात येतोच परंतु मांसाहारी जेवणात कोंबडी व बोकडाचे मास खाण्यास विशेष पसंती दिली जाते. येथील लोकांना गव्हाची चपाती, तांदूळच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा नाचणीच्या पिठाने बनविलेली  भाकरी खाणे आवडते. त्याचबरोबर भारतातील समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांचा त्यांच्या जेवणात माशांचा समावेश आवर्जून करतात. भात आणि मासे हे त्यांचे प्रमुख अन्न असते.

भारतीय अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेतीवरील कामांवर आधारलेली दिसण्यात येते व वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे यांच्या मोठ्या प्रजाती ही भारतातच आढळतात.

भारत हा उष्ण हवामानाचा देश असल्यामुळे येथे सुती कपड्यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. परंतु त्याचबरोबर येथील लोक त्यांच्या पारंपरिक वेशभूषा ही परिधान करण्यात जास्त भर टाकताना आढळते. आपापल्या प्रांतानुसार तेथील रहिवासी आपल्याला त्याप्रकारची वेशभूषा केलेले ही दिसण्यात येतात.

अश्या हया गौरवशाली भारताला व प्राचीन, धार्मिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या  भुमिला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.

Bharat information in marathi | भारत देशाची संपूर्ण माहिती

आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*