महाराष्ट्र राज्यातील किल्ले कोणते आहेत | Forts in Maharashtra in Marathi | भाग:9 | महाराष्ट्राची ओळख | मराठी सल्ला
आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे किल्ले खालील प्रमाणे: (Forts in Maharashtra in Marathi )
रायगड किल्ला (Raigad Fort)
जसे शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला प्रथम आठवतो म्हणजे रायगड. हा किल्ला १६५६ मधे शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकर यांच्याकडून बांधुन घेतला. हा किल्ला अतिशय अभेद व बलाढ्य आहे, या किल्यावर जर आपल्याला जायचे असेल तर १७३७ पाय–या चढुन जावे लागते. आपण हा किल्ला दोन तासात चढुन जाऊ शकतो जर तुम्हाला या पाय–या चढून जायचे नसेल तर तुम्ही रोपवे ने सुद्धा जाऊ शकता हा लेख २०२२ मधल्या माहिती च्या आधारे आहे म्हणून २०२२ मधे रोपवेला २०० रुपये तिकीट आहे एका फेरीसाठी तुम्हाला रोख रुपये २०० दयावे लागतील.
गडावर पाहण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाणे आहेत. गड पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन तास लागतील.तेव्हा रायगड पाहायचा असेल तर सकाळी लवकरात लवकर पोहचण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही पावसाळ्यात गेला तर हिरवळ अतिशय उत्तम दिसते.गडावरील दरबार,राजमहाल,राण्यांचे महाल टकमक टोक, बाजारपेठा,हिरकणी बुरूज शिवरायांची समाधी पाहण्यासारखे आहेत.
शिवनेरी किल्ला (Shivneri Fort)
शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थान आहे या ठिकाणी शिवरायाचा जन्म झाला शिवनेरी हा ३५०० फुट उंचीवरचा किल्ला आहे. या किल्याची चढाई मध्यम आहे या किल्यावर तुम्ही एका तासात पोहचु शकता ही इमारत दोन मजली असुन त्याकाळच्या बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे. गडावर पाहण्यासाठी असणारी ठिकाणे शिवाई दिवीचे मंदिर, गुहा, मुख्य दरवाजा,तसेच शिवजन्म स्थानाची इमारत इ आहेत.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्रातील प्रमुख सण | Major Festivals of Maharashtra in Marathi | भाग : 6
राजगड किल्ला (Rajgad Fort)
राजगड म्हणजे राजांचा गड राजगड असी म्हण आहे.राजगड हा अतिशय बलाढ्य आणि अतिशय उंच असा किल्ला आहे या किल्याची उंची समुद्रसपाटीपासुन १३९४ मीटर आहे.या किल्यावर जाण्यासाठी किमीत कमी तीन तास व जास्तीत चार तास लागतात हा किल्ला चढाईस अवघड आहे तसेच चढाईचा रस्ताही अवघड असल्याळे हा किल्ला चढण्यासवेळ लागतो असे म्हणतात की जो माणूस राजगड पुर्ण चढू शकतो तो माणुस सगळे किल्ले चढू शकतो. तसेच राजगडावरून जवळच आसणारा तोरणा व सिंहगड हे किल्ले सहजपणे दिसतात.
गडावर चढून जाण्यासाठी ४ ते ५ तास लागतात तसेच पुर्ण गड फिरुन पाहण्यासाठी २-३ तास लागतात त्यामुळे राजगड पाहायला जाताना सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा. तसेच इथे रायगडासाररवा रोपवे नाही म्हणुन हागड पुर्णपणे चढुनच जावा लागतो हा किल्ला पुणे शहरापासुन ४८ किमी आहे.
राजगडावरील सईबाईंची समाधी, अर्धचंद्र तलाव,सुवेळा माची,पदमावती तलाव,राजवाडा, संजिवनी माची,काळेश्वरी बुरुज पाहण्यासारखे आहेत. (Forts in Maharashtra in Marathi )
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्याची संस्कृती | Culture of Maharashtra State in Marathi | भाग : 5
तोरणा किल्ला (Torna Fort)
तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड असे पण म्हणतात हा पण किल्ला पुणे जिल्हात आहे अतिदुर्गम अतिविशाल असा हा किल्ला आहे.पुणे येथून तोरणा किल्लाये अंतर ६० किमी इतके आहे तोरणा हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे असे म्हटले जाते की हा किल्लाजिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधलेया गडावर जर पावसाळ्यात गेला तर अतिशय उत्तम असे निसर्ग सैंदर्य तुम्हाला पहायला मिळेल पण लक्षात ठेवा या किल्ल्यावर निसरडी वाट आहे त्यामुळे काळजीपुर्वक जावे या किल्ल्यावर पोहचण्या साठी २ ते ३ तीन लागतात पण हा किल्ला राजगडापेक्षा चढाइला सोप्पा आहे.
भंगाई देवीचे मंदिर मुख्य दरवाजा, झुंजारमाची, बुधला माची, बिनी दरवाजा, किल्लेदारांच्या घराचे अवशेष इत्यादी पाहण्याची ठिकाणे आहेत.
प्रतापगड किल्ला (Pratapgad Fort)
प्रतापगड हा शिवरायांच्या अतिशय महत्वाच्या किल्यापैकी एक किल्ला आहे अफजलखानाचा वध शिवरायांनी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी केला प्रतापगडाची उंची ही १२०० मीटर पर्यंत आहे तसेच त्याचा प्रकार हा गिरीदुर्ग आहे तसेच प्रतापगडाची चढाइची श्रेणी सोपी आहे.
टेहाळणी बुरूज,महादरवाजा,चिलखती बुरूज, केदारेश्वराचे मंदिर,जिजामातां वाडा, इतर गडांच्या तुलनेत प्रतापगड हा अतिशय मजबुत तटबंदी असलेला किल्ला आहे. महाबळेश्वर पासून ८ मैलावर दोन गावामधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information in Marathi | भाग : १
पुरंदर किल्ला (Purandar Fort)
पुरंदर हा किल्ला छत्रपती संभाची महाराजांचे जन्मस्थान आहे या ठिकाणी १४ मे रोजी संभाजी महाराजांची जंयती उत्साहात साजरी होते. पुरंदर किल्याची उंची १५०० मीटर आहे पुरंदर हा किल्ला चढाईस सोप्पा आहे तसेच आपण किल्यावर एका तासात पोहचू शकतो.सासवड पासुन पुरंदर हा किल्ला १५ कि मी आहे तसेच या किल्यावर भारतीय सेनेचा कॅम्प असल्यामळे हा किल्ला पाहयला जाताना ओळखपञ नक्की सोबत घेऊन जा.
बिनी दरवाजा,पुरंदरेश्वर मंदिर,रामेश्वर मंदिर,दिल्ली दरवाज,खंदकडा,पद्मवती तळे, शेंद–या बुरूज पुरंदर माची,भैरवगड बीर मुरारबाजी हे पाहण्यासारखी आहेत.
आणखी माहिती वाचा : महाराष्ट्र राज्यातील जिल्हे | District of Maharashtra State | भाग-4
लोहगड किल्ला (Lohagad Fort)
लोहगड हा किल्ला अतिशय सुरेख व अजुनही चांगल्यापैकी सुस्थितीत आहे या किल्यावरच्या अनेक गोष्टी आजही चांगल्या सुस्थितीत आहे, हा किल्ला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे लोहगडाची उंची ११५० मीटर आहे व चढन सोपी आहे या गडावर जाण्यासाठी पुर्णपणे पाय–या आहेत त्यामुळे आर्धा ते एक तासात तुम्ही या गडावर पोहचु शकता लोहगड हा लोणावळयानजीक मळवली स्टेशन जवळ आहे लोहगडाच्या शेजारीच विसापुर हा किल्ला आहे
गणेश दरवाजा , नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा,महादरवाजा बुरुज हि विशेष ठिकाणे आहेत.
सिंहगड किल्ला (Sinhagad Fort)
पुण्याच्या नैॠतेला सधारण २५ कि मी अंतरावर असणारा हा किल्ला आहे.हा किल्ला समुद्रसपाटीपासुन १५०० मीटर उंच आहे भुलेश्वराच्या पर्वतरांगेवर हा किल्ला आहे. खंदकाचा भाग आणि दुरदर्शन चा मनोरा यामुळे हा किल्ला पुण्यातुन कुठूनही दिसतो. या किल्यावरून आपल्याला राजगड,लोहगड, तोरणा,पुरंदर विसापूर,तिकोना हे किल्ले दिसतात. जर हा किल्ला तुम्हा निंवातपणे पहायचा असेल तर शनिवार–रविवारी जाने टाळावे कारण पुण्याच्या जवळ असल्याने शनिवार रविवारी खुप गर्दी आणि ट्राफिक असते या गडावर वरती पर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे हा गड चढण्याची जास्त गरज नाही जर ताम्हाला गड चढून जायचे असेल तर दुसर्या रस्त्याने जाऊ शकता.
दारुचे कोठार,टिळक बंगला,कोंढाणेश्वर,देवटाके कल्याण दरवाजा,तानाजी व राजाराम स्मारक,तानाजी कडा हि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
तिकोना किल्ला (Tikona Fort)
या किल्याला विंतडगड असे पण म्हणतात याची उंची ११०० मी आहे हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे चढाई या किल्ल्यावर सोपी आहे एका तासात तुम्ही या किल्यावर पोहचु शकता या किल्यावर बहुतेक ठिकाणी पायच्या आहेत त्यामुळे हा किल्ला चढाईस सोपा आहे पुण्यापासुन साधारण ६० कि मी अतरावर हा किल्ला आहे. तिकोना किल्यापासुनच ३–४ किलोमीटर वर तंग हा किल्ला आहे या किल्याच्या त्रिकोनी इकारामळे तिकोना हे नाव पडले पावसाळयात या किल्यावरचे निसर्ग सैंदर्य अतिशय पाहण्यासारखे असते.
ञिंबकेश्वर महादेवाचे मंदिर,तलाव,तळी व धान्य कोठार, तुळजाईचे मंदिर हि महत्त्वाची ठिकाणे आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)
सिंधुपुर्ग जिल्हातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग. त्याचे बांधकाम २५ नोव्हेंबर १९६४ ला चालु झाले होते. इतिहास सांगातो की त्या काळी हा किल्ला बांधण्यासाठी ३ वर्ष लागले व एक कोटी होन खर्ची पडले हा किल्ला सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. त्याचा तट २ मैल – इतका आहे याची उंची २०० फुट आहे चढाइची श्रेणी सोपी–ओह तसेच जर तुम्हाला या किल्ल्यावर भेट द्यायची असेल तर पावसाळयात जाणे टाळा कारण पावसाळयात या किल्ल्यावर जाण्यास बंदी असते. या किल्ल्याला भारत सरकारने २०१० मधे महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन घोषित केले. (Forts in Maharashtra in Marathi)
सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार,समुद्रबुरुज,जरीमरीच देऊळ शिवराजेश्वराचे देवालय,गोडया पाण्याचे तलाव हि पाहण्यासारखे आहेत.
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला महाराष्ट्र बद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply