महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरे कोणते आहे? | Main City of Maharashtra in Marathi | भाग:3 | महाराष्ट्राची ओळख | मराठी सल्ला
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर आणि नाशिक यांचा समावेश आहे. (Main City of Maharashtra in Marathi)
मुंबई (Mumbai)
महाराष्ट्राची राजधानी माया शहर मुंबई आहे हे आपण जाणतोच. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले मुंबई हे एक सुंदर नैसर्गिक बंदर आहे. एकीकडे अथांग पाणी वाहून नेणारा समुद्र आणि दुसरीकडे गगनचुंबी इमारती या शहराला सजवतात. ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. वडापाव हा मुंबईचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी सिनेउद्योगाचे केंद्र आहे. मुंबईचे बॉलीवूड पाश्चिमात्य देशातील हॉलिवूडला टक्कर देते, असे म्हटले जाते.
प्राचीन काळी हे कोळी आणि धिवरांचे निवासस्थान होते, असे म्हटले जाते. त्यांची अधिष्ठात्री देवता मुंबादेवी यांच्या नावावरून त्याचे नाव मुंबई ठेवण्यात आले. रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information in Marathi | भाग : १
पुणे (Pune)
पुणे हे भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. हे ऐतिहासिक शहर मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. मुठा नदीच्या काठावर असलेल्या पूणेश्वर मंदिराच्या नावावरून या शहराचे नाव पडले आहे. या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते. इ.स. १६३६ मध्ये छत्रपती वीर शिवरायांचे वडील शहाजीराव यांनी येथे लाल महाल बांधला.असे म्हटले जाते की वीर शिवरायांचे बहुतेक बालपण येथे गेले. हे शहर ऐतिहासिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे.
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी‘ म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. मिसळ हे इथल प्रमुख खाद्यपदार्थ आहे.
लाल महाल, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
नागपूर (Nagpur)
नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपुर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे. २००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नजीकच्या संभाव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे नागपूर शहर बहुचर्चेत आहे.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्राचा इतिहास | History of Maharashtra in Marathi | भाग : 2
नाशिक (Nashik)
नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन–निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली‘ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे. (Main City of Maharashtra in Marathi)
पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर कुंभमेळा भरतो. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे.
औरंगाबाद (Aurangabad)
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मुख्य शहर असून येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. २४ एप्रिल २०२३ मध्ये औरंगाबादच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका निकाली निघेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजी नगरचा अधिकृत संपर्क आणि रेकॉर्डमध्ये वापर करण्यास मनाई केली आहे. 7 जून रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत राज्याला नवीन नाव वापरण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी,वेरूळ लेणी,बीबी का मकबरा ,पाणचक्की, सिद्धार्थउद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकांनी दौलताबाद येथे आपली राजधानी वसवली होती तसेच औरंगजेबाचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.
औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी. असून लोकसंख्या २७,०१,२८२ (२०११ जनगणना) इतकी आहे. शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीके – कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी,गहू ही आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या – गोदावरी,तापी, पूर्णा ह्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ टेकड्या – म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी ह्या आहेत.
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला महाराष्ट्र बद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply