Religious Place of Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे | भाग : 8

Religious Place of Maharashtra in Marathi

महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे कोणते आहेत  | Religious Place of Maharashtra in Marathi | भाग:8 | महाराष्ट्राची ओळख  | मराठी सल्ला

Religious Place of Maharashtra in Marathi

अखिल विश्वात भारत हा एक असा देश आहे की जेथे सर्व धर्म आणि पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. धार्मिकता हे येथील आणखीन एक वैशिष्टय. आपापल्या धर्माप्रती श्रध्दा भक्ती सद्भावना व्यक्त करतांना मोठया प्रमाणात तिर्थयात्रा केल्या जातात. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं देखील जगमान्य आहेत आणि दर्शनाकरता भारतातुनच नव्हे तर देश विदेशातुन देखील भाविक येथे भेटी देण्याकरता येतांना दिसतात. (Religious Place of Maharashtra in Marathi)

शिर्डी (Shirdi)

Religious Place of Maharashtra in Marathi

सबका मालिक एक हा संदेश देणारे साईबाबा. शिर्डी ज्यांच्या पावन पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनित पावन झाली. त्यांच्या पश्चात आज देखील भक्तांना त्यांच्या असल्याची सतत जाणीव होते. रोज भक्तांच्या झुंडी च्या झुंडी दर्शनाकरता लोटतात असे साईबाबांचे शिर्डी धाम आपल्या लेखात सर्वात वरचे स्थान मिळवते त्याचे विशेष कारण म्हणजे साईबाबांच्या दर्शनाकरता भारतातुन तर भाविक भक्त येतातच पण विदेशात देखील बाबांचे असंख्य भक्त असुन ते देखील भारतात आल्यानंतर शिर्डी ला आवर्जुन दर्शनाकरता येतात. अनेक भाविक भक्त साईबाबांना सोने चांदी, नगदी रोकड अर्पण करतात. त्यातुन संस्थानच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरू असुन रूग्णांकरता मोठे हॉस्पिटल देखील शिर्डी येथे सेवाकार्य करत आहे. साईबाबांचे शिर्डी धाम अहमदनगर जिल्हयात असुन महामंडळाच्या बसेस, रेल्वे आणि खाजगी वाहनाने या धार्मिक स्थळाला आपल्याला भेट देता येते.


आणखी माहिती वाचा :महाराष्ट्रातील प्रमुख सण | Major Festivals of Maharashtra in Marathi | भाग : 6


पंढरपूर (Pandharpur)

Religious Place of Maharashtra in Marathi

विठु माऊली तु… माऊली जगाची… माऊलीत मुर्ती विठ्ठलाची! अशी ही सावळी विठ्ठलाची मुर्ती भक्ताला इतके वेड लावते की हा भक्त तहान भुक, प्रपंच सगळं विसरतो आणि लिन होतो ते विठ्ठलाच्या चरणाशी. या देवतेचं महत्वाचं वैशिष्टय म्हणजे त्याचा भक्त हा वारकरी आहे, शेतकरी आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे. शिवाय जातीपातीच्या पलिकडचा हा सावळा विठुराया सगळया जाती धर्माच्या पलिकडचा असल्याने सर्वधर्म समभावाचा जणु पुरस्कर्ताच म्हणावा असा. आषाढी वारी तर अनुपम्य असं आगळंवेगळं आणि सर्वांनाच विचारात पाडणारं कार्य! या विठ्ठलाच्या वेडापायी वारकरी शतकानुशतके करत आहेत. देहभान विसरून वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्याला पाहिले की जणु विठ्ठल आपल्याला भेटला असे वाटते. पंढरपुर सोलापूर जिल्ह्यात असुन रेल्वे बससेवा आणि खाजगी वाहनाने चांगल्या तऱ्हेने जोडले गेले आहे. भेटी लागी जिवा…लागलीसे आस…असा हा सर्वधर्मीयांचा विठुराया महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे.


आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्याची संस्कृती | Culture of Maharashtra State in Marathi | भाग : 5


सिद्धिविनायक मंदिर मुंबई (Siddhivinayak Temple- Mumbai) 

मुंबई येथील सिध्दीविनायक संपुर्ण विश्वात प्रसिध्द असे श्री गणेशाचे मंदिर आहे नवसाला पावणारा गणेश अशी त्याची ख्याती सर्वदुर पसरल्याने मुंबईला आल्यानंतर भाविक येथे दर्शनाकरता आवर्जुन येतात. या श्री गणेशाचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे हा उजव्या सोंडेचा गणेश असुन म्हणुन त्याला सिध्दीविनायक असे म्हंटल्या जाते. हे मंदिर मुंबईत प्रभादेवी भागात असुन प्रत्येक मंगळवारी दर्शनाकरता भाविकांची मोठया प्रमाणात येथे गर्दी होते. मोठमोठे चित्रपट कलावंत आणि उदयोगपती सिध्दी विनायकाचे भक्त असुन नेहमी दर्शनाकरता येत असतात. मुंबईतील पर्यटन बसेस देखील आपल्याला या गणेशाचे आवर्जुन दर्शन घडवतात. पुर्वी मंदिर लहान होते पण मिळणाऱ्या दानराशींमधुन आज जे मंदिर आपण पहातो आहोत ते चक्क पाच मजली असे भव्य मंदिर दृष्टीस पडते. अनेक समाज उपयोगी कार्य मंदिर ट्रस्ट कडुन केले जात आहेत.


आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information in Marathi | भाग : १


कोल्हापूरची महालक्ष्मी (Mahalakshmi- Kolhapur)

साडे तिन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ कोल्हापुर निवासीनी महालक्ष्मी भक्तांचे श्रध्दास्थान आहे. कोल्हापुर या शहराला ऐतिहासीक महत्व या मंदिरामुळे प्राप्त झाले आहे या ठिकाणी दर्शना करता भाविकांची अमाप गर्दी होत असते. हिंदु पुराणात उल्लेख केलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडे तिन शक्तीपीठांपैकी कोल्हापुर निवासी अंबाबाई महत्वाचे शक्तीपीठ आहे. या देवीची रोज बांधण्यात येणारी पुजा अप्रतीम अशी असते त्या व्यतिरीक्त नवरात्रात देवीचे आभुषण, साजश्रृंगार हे अतिशय सुंदर आणि देखणे असे असते. भक्तांच्या हृदयात या देवी बद्दल अपार भक्ती आणि श्रध्दा आहे. या मंदिराचे बांधकाम देखील वैविध्यपुर्ण असुन भक्तांकरता निवासस्थानाची सुध्दा सोय या ठिकाणी संस्थानने केली आहे. कोल्हापुर वरून कोकण जवळ असुन येथुन कोकणात जाण्याकरता भरपुर सोयी असल्याने सुध्दा पर्यटक या ठिकाणी दर्शन घेउन कोकणात फिरण्याकरता जातात.


आणखी माहिती वाचा : Main City of Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरे | भाग-3


शनी शिंगणापुर (Shani Shingnapur)

हिंदु धर्मीयांच्या देवतांमधील ज्या देवाच्या रूष्ट (क्रोधीत) होण्याची भिती आपल्याला सर्वात जास्त वाटते ती देवता म्हणजे शनिदेव. या शनिदेवाला प्रसन्न करण्याचे जेवढे उपाय सामान्य माणसाला ज्ञात आहेत तेवढे उपाय करून शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. शनिदेवाचे महत्त्वाचे स्थान महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर असुन या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात शनीदेवाचे दर्शन घेण्याकरता येत असतात. विशेषतः ज्या भाविकांना साडेसाती असते ते आवर्जृन या ठिकाणी शनिदेवाचे दर्शन घेतात अभिषेक आणि पुजाअर्चना करतात. शनिवारी या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते. शनि शिंगणापुर हे ठिकाण शिर्डी पासुन जवळ असुन शिर्डी ला येणारे भक्त येथे सुध्दा दर्शनाकरता येतात. शनि शिंगणापुर अहमदनगर जिल्हयात असुन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी वाहनाने येथे येणे सोयीचे आहे. या गावाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे येथील एकाही घराला दरवाजा नाही.


आणखी माहिती वाचा : महाराष्ट्र राज्यातील जिल्हे | District of Maharashtra State | भाग-4


तुळजापूर (Tuljapur)

महाराष्ट्राची आराध्य देवता आणि साडे तिन शक्तीपीठांपैकी एक संपुर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापुरची आई तुळजाभवानी. छत्रपती शिवरायांना जीने तळपती तलवार हाती दिली ती तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्हयात आहे.शिवाजी महाराज आई जिजाऊ सोबत येथे नेहमी दर्शनाकरता येत असत.अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.प्राचीन ५१ शक्तीपीठांपैकी हे एक महत्वाचे शक्तीपीठ आहे. हेमाडपंथी शैलीत या मंदिराचे बांधकाम असुन साधारण १२ व्या शतकात या मंदिराची निर्मीती करण्यात आली आहे. हि मुर्ती स्वयंभु असुन भवानी रूपात या मुर्तीची पुजा करण्यात येते. तुळजापुर उस्मानाबाद पासुन २२ कि.मी. आणि सोलापुर पासुन ४४ कि.मी. अंतरावर आहे.

शेगाव (Shegaon)

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगांव ला श्री गजानन महाराजांची समाधी आहे. येथे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनाला येतात. येथील व्यवस्थापक मंडळ हे प्रशंसा करण्यायोग्य आहे, तेथील मंदिराची स्वच्छता हि उल्लेखनीय आहे, तसेच तेथील कार्माच्यार्यांची शिस्तही प्रशंसे जोगी आहे. येथे गजानन महाराजांची समाधी असून दरवर्षी माघ महिन्यामध्ये प्रगटदिन साजरा केल्या जातो, तेव्हा तेथे लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी उमळते, महाराष्ट्रातील तीर्थस्थानांपैकी एक असे शेगांव आपण जर अजून येथे भेट दिली नसेल तर आपल्या परिवारासोबत एकवेळ अवश्य भेट द्या. (Religious Place of Maharashtra in Marathi)


आणखी माहिती वाचा :महाराष्ट्राचा इतिहास | History of Maharashtra in Marathi | भाग : 2


भीमाशंकर ज्योतिलिंग मंदिर (Bhimashankar Jyotirlinga Temple)

भीमाशंकर ज्योतिर्लिंग, भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे हे महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे १०० किमी अंतरावर आणि मुंबईपासून सुमारे २२३ किमी अंतरावर असलेले एक अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे सह्याद्री पर्वतरांगेतील खोऱ्यातील भोरगिरी गावात वसलेले एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांमध्ये समाविष्ट असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

भीमाशंकर टेकडीने वेढलेले, हे निसर्गरम्य भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे हिरव्यागार दऱ्यांनी सजलेले ठिकाण आहे, जे ट्रेकिंगसाठी अतिशय चांगले ठिकाण म्हणून ओळखले जाते. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या भेटीदरम्यान, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाजवळ असलेल्या भगवान शिवाच्या दर्शनासोबत तुम्ही अनेक निसर्गरम्य आणि प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

मोरश्वर मंदिर पुणे (Moreshwar Temple- Pune)

पुण्यातील मोरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे जे गणपतीच्या आठ विनायक मंदिरांपैकी पहिले म्हणून ओळखले जाते. काळ्या पाषाणापासून बनवलेले हे मंदिर चार मिनार आणि ५० फूट उंच भिंतीने सजवलेले आहे.

जेव्हा तुम्ही मोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी याल तेव्हा तुम्ही भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान राम, भगवान विघ्नेश इत्यादी गणेशाच्या २३ मूर्तींसह इतर देवतांच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता.


आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळे | Tourist Point of Maharashtra in Marathi | भाग : 7


जीवदानी मंदिर मुंबई (Jivdani Temple- Mumbai)

विरार येथे जीवदानी टेकडीवर माँ जीवदानी मंदिर स्थित आहे . पर्वतावर स्थित विरार सर्वात लक्षणीय ठरले आहे. देवी जीवदानी तिच्या फक्त मंदिर साठी देशभरात प्रसिद्ध आहे.

जमिनीवर सपाटीपासून सुमारे १३७५ पायऱ्या स्थित आहे, हा उंच डोंगर शहराच्या पूर्व भागेत आहे.विरार येथे १५० वर्षीय जीवदानी मंदिर, रविवारी व उत्सवात लाखो भाविकांना आकर्षित करता . पायथ्याशी वसलेले पापाद्खंदी धरण, हा स्थान ताजे पाणी साठी मुख्य स्त्रोत होता.

 


आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला महाराष्ट्र बद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

महाराष्ट्राची ओळख

भाग: 1

महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information in Marathi | भाग : १

भाग: 2

महाराष्ट्राचा इतिहास | History of Maharashtra in Marathi | भाग : 2

भाग: 3

Main City of Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरे | भाग-3

भाग: 4

महाराष्ट्र राज्यातील जिल्हे | District of Maharashtra State | भाग-4

भाग: 5

महाराष्ट्र राज्याची संस्कृती | Culture of Maharashtra State in Marathi | भाग : 5

भाग: 6

महाराष्ट्रातील प्रमुख सण | Major Festivals of Maharashtra in Marathi | भाग : 6

भाग: 7

महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळे | Tourist Point of Maharashtra in Marathi | भाग : 7

भाग: 8

Religious Place of Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे | भाग : 8

भाग: 9

Forts in Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील किल्ले | भाग : 9

भाग: 10

Saints of Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील संत | भाग: 10

भाग: 11

Famous Personalities of Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व | भाग: 11

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*