भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश | Shradhanjali message in Marathi | Bhavpurna shradhanjali in Marathi | Bhavpurna shradhanjali in marathi text
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश कोणालाही वापरायला आवडत नाहीत. परंतु आपल्या सर्वांना हे माहित आहे की या पृथ्वीवर कोणत्याही सजीव जीवाला एक ना एक दिवस त्यांचे हे शरीर सोडून जावेच लागणार आहे. जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आहेत, जे निश्चितपणे घडणारच आहे. कोणी तरी नवीन व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपण खूप खुश असतो पण तीच व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा तेवढेच दुःख आपल्याला होते. अशा परीस्थित आपल्याला गरजेचे आहे कि आपल्या दुखी मित्राला किंवा त्या कुटूंबाला सांभाळून घेणे. म्हणून च आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत Shradhanjali Message In Marathi ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या परिजनांना आधार देऊ शकता. (Bhavpurna shradhanjali in Marathi)
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏🏻
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
आपल्या वडिलांना देवाज्ञा
झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
आणखी माहिती वाचा : Birthday wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.”
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
आणखी माहिती वाचा : Friend Birthday Wishes in marathi | मित्राला वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for girlfriend in Marathi | गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻
Bhavpurna Shradhanjali In Marathi For Mother | आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश
आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही…
का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…
तुझ्या आत्म्यास शांती मिळो
आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील…
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील…
आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे!
आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते…
कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते….
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे…
आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही.
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..
याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे असशील तिथे
माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही..
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Shradhanjali in Marathi for father | बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश
अस्वस्थ होतयं मन,
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
💐 “भावपूर्ण श्रद्धांजली” 💐
आठवण येते त्या प्रेमाची
जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची
जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते,
बाबा तुमची आठवण कायम येत राहील.
आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे.
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे..
बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
मायाळू, प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही.
बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस..
तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
Bhavpurn shradhanjali banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी
असा जन्म लाभावा देहाचा
चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध
दरवळत राहावा ।
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐
अश्रृंचे बांध फुटूनी,
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी,
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐
हे विधात्या पुरे पुरे रे,
दुष्ट खेळ हा सारा !
आकाशातून पुन्हा निखळला,
एक हासरा तारा !!
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐
आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐
Shradhanjali Message For Grandparents in Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश
आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…
भावपूर्ण श्रद्धांजली
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.
आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं..
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे…
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या
सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास
आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…
भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही जग सोडून गेलात तरी
प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही…
तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही.
आजी होतीच माझी दुसरी आई…
प्रेमळ त्या विठूची रखुमाई…
तुला भावपूर्ण आदरांजली
आई बाबानंतर सगळ्यात
जवळची व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल असे वाटलेसुद्धा नाही.
तुमची सावली होती म्हणून
कधीच वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी…
भावपूर्ण श्रद्धांजली
Shradhanjali Status In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली
पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस…
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
भावपूर्ण आदरांजली
ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली!
जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही…
भावपूर्ण आदरांजली!
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली
जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही…
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही
Rest in peace messages in Marathi | रेस्ट इन पिस मराठी संदेश
अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला.
💐Rest in peace💐
…….. गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी
डोळ्यासमोर आल्या
……. विषयी लिहीणार काय?
अचानक exit मनाला पटली नाही यार
💐Rest in peace.💐
सुखात दिली कायम दिली तुझी साथ…
तू नसतानाही राहील तशीच साथ…
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच…
आठवण कायम येत राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली
भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देव या परम आत्म्यास शांती देवो.
जग सोडून जाणे आपल्या हातात नाही.
. पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या
आत्मशांतीसाठी मात्र आपण प्रार्थना करु शकतो.
व मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो
अत्यंत दुर्देवी असा दिवस…
देव हे सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो.
Dukhad nidhan messages Marathi | दुःखद निधन मेसेज मराठी
स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने काल
वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक,
आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…
आमचे चुलते कै……… यांचे
दि. …….. रोजी अल्पशा आजाराने
निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांती देवो….
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
दुःख निधन
माझे वडील ……यांचे दुःख निधन
झाले आहे.
अंत विधी …….. वाजता आहे.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||💐
Leave a Reply