Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

Essay on Mother in Marathi

Majhi Aai Essay in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये | Essay on Mother in Marathi | Majhi Aai Nibandh Marathi

Essay on Mother in Marathi

माझी आई निबंध मराठी 10 ओळी । माझी आई निबंध मराठी 20 ओळी  । माझी आई निबंध मराठी 50 ओळी । माझी आई निबंध मराठी 300 शब्द । मला भावलेली आदर्श आई निबंध । माझी आई माहिती । माझी आई भाषण । मराठी निबंध दाखवा । निबंध मराठी माझी आई ।आई माझी मायेचा सागर | Mazi Aai Essay in Marathi | Majhi Aai Essay in Marathi for 5th std | Majhi Aai Essay in Marathi for 6th std | Majhi Aai Essay in Marathi for 7th std | my mother essay in marathi | Essay on Mother in Marathi

आई ही अशी व्यक्ती आहे जी आपल्याला जन्म देते, वाढवते आणि आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करते. आईचे प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची गुरू असते. आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते आणि जगण्याची कला शिकवते. आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे भांडवल आहे.

Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines | माझी आई निबंध मराठी 10 ओळी

  • माझी आई सर्वात सुंदर प्रेमळ आणि दयाळू आहे.
  • माझ्या आईचे नाव स्वाती आहे.
  • माझी आई सकाळी लवकर उठते आणि तिचे दैनंदिन काम सुरु करते.
  • माझी आई कुटुंबातील सर्वासाठी चविष्ट खाद्यपदार्थ बनविते, आणि म्हणून आम्ही तिला घराची अन्नपूर्णा अस म्हणतो.
  • माझ्या शाळेची सर्व तयारी माझी आई करून देते.
  • माझी आई मला अभ्यासाठी मदत करते.
  • माझी आई मला नेहमी योग्य गोष्टी करण्यासाठी मदत करते.
  • माझी आई मला रामायण, महाभारतातील कथा सांगते तसेच बोधकथा पण सांगते.
  • माझी आई माझ्या कुटुंबातील एक आधार आहे.
  • मी माझ्या आई वर खुप प्रेम करतो माझी आई मला खुप आवडते.

Essay on Majhi Aai in Marathi 100 Words  | माझी आई निबंध मराठीमध्ये  100 शब्द.

माझी आई मला खुप आवडते. ती खुप प्रेमळआहे. माझ्या आईचे नाव सुवर्णा आहे. ती दररोज सकळी लवकर उठते. घरात साफसफाई करते. तीं देव पूजा करते. माझी आई खुप समजुतदार आणि दयाळू आहे. ती आमची सगळ्यांची खुप काळजी घेते. ती आमच्‍या कुटुंबासाठी जेवण बनवते.

ती मला अभ्यासात अडचण आली तर मदत पण करते. मी आजरी असलो की ती रात्रभर जागते आणि माझी काळजी घेते. माझी आई माझी चांगली मैत्रीण आणि गुरु आहे. वेळोवेळी ती मला चांगले मार्गदर्शन ही करते  तिचे माझ्यावर संस्कार खूप छान आहे.

ती मला चांगली सवय लावते जसे की सगळ्यांचा आदर  करणे, कोणी संकटा मध्ये असेल तर  त्यांची मदत करणे, नेहमी खरे बोलणे. माझ्या मनातल्या सर्व गोष्टी मी माझ्या आईला सांगतो. मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो  की मला अशी  मायालु  आणि समजूतदार  आई मिळाली. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो.


आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत


माझी आई निबंध मराठीमध्ये  200 शब्द  | Marathi Nibandh on Mazi Aai 200 Words

माझ्या आईचे नाव अस्मिता आहे. माझी आई माझी खूप काळजी घेते. मी काय करतो काय नाही त्यावर तिचे बारीक लक्ष्य असते. तिचा  मला खूप आधार वाटतो. रात्री झोपताना ती माझ्या बाजुला असली की मला छान  झोप लागते. माझी आई शाळेमध्ये शिकवते त्यामुळे तिला खुप वेळ नसतो.

तरीही ती माझ्यासाठी रोज संद्याकाळी थोडा वेळ काढते. तेव्‍हा आम्ही खूप बोलतो. मी चुकिचा वागलो की ती मला रागावतेसुद्धा  पण नंतर प्रेमाने जवळ ही घेते. मला खुप ताप आला की त्या वेळी ती माझ्या बाजुला बसुन राहते. तिला वेळ असला की  ती माझ्या साठी  चमचमीत पदार्थ बनवते.

ती माझा अभ्यास घेते. खरे तर तिचे विध्यार्थी वयानी मोठे असतात पण ती मलाही चांगले शिकवते. माझ्यासारखी तिलाही उन्हाळ्यात सुट्टी असते  त्यामुळे मला तेव्हा माझी आई पूर्ण वेळ देते. अर्थात  तेव्‍हा तिला उत्‍तरपत्रिका तपासणं अशी कामे असतात, पण त्यातूनही ती माझ्यासाठी  वेळ काढते.

ती मला बागेत फिरायला नेते आणि लहान मुलांचे नाटक सुधा दाखवते. मी देवाचे खूप आभार मानतो कि मला अशी भाग्यवान आई मिळाली.

माझी आई निबंध मराठीमध्ये  300 शब्द | Nibandh on Majhi Aai in Marathi 300 Words

माझ्या आईचे नाव लक्ष्मी आहे. माझ्या आईचा जन्म हा पनवेल  मध्ये झाला. माझ्या आईच वय ४१ आहे. माझ्या आईने तिचे शिक्षण मराठी माध्यम शाळेत पूर्ण  झाले. मी आत्ता जे काही आहे ते मी माझ्या आई मुळेच आहे. माझी आई  मला खूप समजून घेते त्यामुळे मला माझ्या मनातील गोष्टी  तिला सांगायला  खूप आवडतात.

घरची परिस्थिती  बिकट असली तरीही माझी आई सर्वाना खुश ठेवते. एखाद्या गोष्टीचे नियोजन कसे करावे ते मी  माझ्या आई कडून शिकलो आहे. आईमुळे घराला घरपण असते.

कुटुंबातील सर्वजणांची  आईला  फार  काळजी असते. माझ्या आईने स्वतःला  कधींच काही घेतले नाही परंतू मला कधी काही कमी पडू दिले  नाही. पहाटे पासुन आईच्या दिवसाची सुरवात होते. देवपूजा आई न थकता करत असते, सर्व जेवण बनवून बाकीचे सर्व कामे करूनसुद्धा कधीही आई थकत नाही.

मी लहान असताना शाळेत जाण्याआधी माझी सहलाची तयारी माझी आई करूण देत असे. जेव्हा मी  घरामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा मला आई दिसली की मला खुप समाधान मिळतो. माझ्या आईने माझ्यावर नेहमी चांगले संस्कार दिले. जिथे मी योग्य असतो तेव्हा ती  माझे  खूप लाड करते आणि जिथे मी चुकत  असेल तिथे मला समजावते.

आईची तुलना कोणासोबत केली जाऊ शकत नाही. आईमुळे जिवनात आनंद आणि सुख समाधान आहे. मी नेहमी आईच्या आरोग्याची काळजी घेईन आणि माझ्या आईला दिर्घ आयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मला माझी आई खुप आवडते. माझी आई माझी खुप काळजी घेते. आई ही खरोकर परमेश्वराने दिलेली सर्वात  चांगली भेट आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईची भूमिका महत्त्वाची असते. आई बद्दल  कितीही सांगितल तरीही कमीच आहे. आपल्याला काही कळत नसते तेव्हापसून ते आपल्याला काही कळे पर्यंत आपली आई काळजी घेते. चांगले  विचार आणि चांगली शिकवण आपल्या आईकडून मिळतात.

आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे पहिली गुरू. कवी यशवंत म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी। यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनातील आईचे महत्त्व समजून घेणे हे केवळ एक विचार नसून एक जिवंत वास्तव आहे. माझी आई माझे सर्वस्व आहे.


आणखी माहिती वाचा : मदर्स डे मराठी शुभेच्छा | Mothers Day Quotes in Marathi


Mazi Aai Essay in Marathi 500 Words | माझी आई  निबंध मराठीमध्ये 500 शब्द

आई हा शब्द मनाला मोहन होऊन जाते. जेव्हा छोटा बाळ पहिल्यांदा आई हा शब्द उच्चरते तेव्हा आईला किती आनंद  होतो. कारण आई हा शब्द ऐकायला कितीतरी दिवसापासून आतुरतेने वाट बघत असते. माझी आई सकाळी लवकर उठते. सर्व घरचे काम करते. माझी तयारी करून देते. घरातल्या सर्वांची काळजी घेते. माझी आई खूप कष्टाळू आहे. मुलांची जोपासना करते थोडं लागलं तर ति धावून येते.

माझ्या आईबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिचे प्रेम. हे एका उबदार मिठीसारखे आहे जे कधीही दूर होत नाही. जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा ती देखील आनंदी असते. जेव्हा मी दुःखी असतो, तेव्हा ती मला मजेदार विनोद आणि गुदगुल्या करून आनंदित करते. तिचे प्रेम नेहमीच माझ्यासोबत असते, जरी ती माझ्या बाजूला नसली तरीही. माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे.

आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असे म्हणतात कि देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. माझी आई फार प्रेमळ आहे. माझी आई सर्वोत्कृष्ट आहे, कारण ती दररोज माझी काळजी घेते. ती स्वादिष्ट अन्न बनवते ज्यामुळे माझे पोट आनंदी असते. माझी खेळणी किव्हा वस्तू  कुठे आहेत हे तिला माहीत आहे, मी विसरलो तरीही ती मला खूप हसतमुखाने ती शोधण्यात मदत करते.

माझी आई माझे सर्वस्व आहे ती पहिली गुरु मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण देखील आहे. माझी आई मला या जगापेक्षा खूप वेगळी वाटते माझी आई खूप छान आहे तिने मला जन्म देऊन या जगात आणले.माझी आई आमच्या कुटुंबासाठी अगणित त्याग आणि कठोर परिश्रम करते.

पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत, आमचे घर उबदार आणि आरामाचे ठिकाण आहे याची खात्री करण्यासाठी ती अथक परिश्रम करते. ती मला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवते. वेळेचे महत्व समजवून सांगते. असे म्हणतात कि आई प्रत्येकाच्या आयुष्यातील वरदान आहे जिच्या आशीर्वादाने आम्ही घडतो.

आईमुळेच आपल्या जीवनात अर्थ प्राप्त होतो. ती आपल्याला जन्म देतेच पण आयुष्यभर पुरेल अशी संस्काराची सदविचाराची शिदोरीही देत असते. आई म्हणजे अपार काळजी करणार मन असते. हजारो चुक माफ करणारी म्हणजे आपली आई.

प्रेमाने घास भरवते ती आई. वेळपसंगी स्वतः उपाशी राहील पण आपल्या मुलांना कधीही उपाशी ठेवत नाही ती म्हणजे आई. आई म्हणजे स्वतःसाठी न जगता फक्त आणि फक्त आपली मुले व कुटुंबासाठी जगणारी व्यक्तिमत्व. आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर. ती नसेल तर सर्व काही असून सुद्धा अर्थ नाही. शेवटी मी आईसाठी एवढच लिहेल….

“मागच्या जन्माची पुण्याई

म्हणून तुझ्या पोटी जन्म घेतला

हे विश्व पाहिलं नव्हतं पण

श्वास मात्र स्वर्गातच घेतला”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*