Birthday Wishes For Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | happy birthday wishes for mother in marathi
आईचे प्रेम अतुलनीय आहे, तिचे त्याग अतुलनीय आहेत आणि तिची शिकवण अमूल्य आहे. तिचा वाढदिवस हा एक असा प्रसंग आहे जो आपल्याला तिच्याबद्दल आपले मनापासून कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्यास अनुमती देतो. तिला आपल्या जीवनातील तिचे महत्त्व लक्षात आणून देण्याची ही एक संधी आहे. आणि आपल्या भावना आपल्या मातृभाषेत, मराठीत व्यक्त करण्यापेक्षा त्यापेक्षा चांगला मार्ग कोणता? या खास दिवशी तुमच्या भावना व्यक्त करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, ही ब्लॉग पोस्ट तुमच्या आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा संग्रह सादर करतो – “आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. (Birthday Wishes For Mother In Marathi)
तुमच्या आईचा वाढदिवस हा फक्त तिच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठीही खास दिवस आहे. तिची शक्ती, शहाणपण आणि तिचे तुमच्यावर असलेले बिनशर्त प्रेम साजरे करण्याचा हा दिवस आहे. आम्ही आशा करतो की मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हा संग्रह – “आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, तुम्हाला तिच्याबद्दल तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास सक्षम करेल. या हृदयस्पर्शी शुभेच्छांसह तिचा दिवस संस्मरणीय बनवूया आणि तिला आपल्या हृदयातील तिच्या विशेष स्थानाची आठवण करून देऊ या. हा वाढदिवस आनंदाने आणि मातृप्रेमाने भरलेला आहे.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Mother in Marathi
आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
आई तुला वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा
जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
हॅपी बर्थडे मम्मी
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाला जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.
मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आईच्या पायावर डोके ठेवले
तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.
जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday आई !!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा,
पूर्णतः समजण्यास आपण असमर्थच असतो
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! Wadhdivsachya Hardik Subhechha (Birthday wishes in Marathi)
आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!
ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
best wish you Happy Birthday Mom
माझ्यात असणाऱ्या
सर्व चांगल्या गोष्टींची
जननी माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मनात असणाऱ्या
गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या कठीण काळातील
आधारस्तंभ आणि यशाचे
कारण असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या आनंदासाठी ईश्वराने माझा
आनंद कमी करावा हीच
ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
आईच्या प्रेमाची ❤️ किंमत कोणतेही
मूल चुकवू शकत नाही. आई,
माझा स्वर्ग तुझ्या चरणी आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
निस्वार्थी प्रेम म्हणजे काय हे
मी तुझ्याकडून शिकलो.
तुमचा मुलगा/मुलगी असल्याचा
मला अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.
नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या ✨ वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या
खूप शुभेच्छा
आज मी जिथे आहे ते तुझ्या
मेहनतीचे फळ आहे.
तुझ्या दीर्घायुष्यासाठी
मी देवाकडे प्रार्थना ???? करतो.
❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.❣️
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
Happy birthday aai! (Birthday wishes in Marathi)
मी कितीही मोठा झालो तरी तुझ्यासाठी
लहान निरागस बाळच राहीन.
माझ्या सर्व निर्णयांमध्ये मला साथ
दिल्याबद्दल धन्यवाद आई.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन
तुला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या स्वप्नांना तू साकार केलं आहेस आई
माझ्या ध्येयाला तु आकार दिला आहेस आई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नऊ महिने पोटात सांभाळते आणि आयुष्य भर लेकरांची काळजी घेते
माहित नाही आई हे सगळं कोणत्या पुस्तकातून शिकते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.✨
आईच्या प्रेमाचे मोल केले जात नाही
आई तो अथांग समुद्र आहे ज्याला अंत नाही.
हॅप्पी बर्थडे आई.
माझ्यासाठी खूप अनमोल आहेस आई,
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आई,
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यात आनंदाचा खजिना घेऊन येवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी
खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा..!
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..
ज्या माऊलीने मला जन्म दिला
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तीच्या वाढदिवशी
नमन करतो तुला मी आई.
हॅपी बर्थडे आई
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला
हसतमुखाने सामोरे जाते,
ती माझ्यासाठी प्रेरणा आहे,
आई नेहमी अशीच हसत राहा…!!
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई!
सुटत ते घर, आठवणी कधीच सुटत नाही,
आई नावाचं आयुष्यातील पान कधीच मिटत नाही,
थकून जातात पाय जेव्हा सारा जन्म चालून,
शेवटच्या श्वासापर्यंत आई हेच शब्द राहतात.
हॅप्पी बर्थडे आई.
माझी काळजी करणे ती कधीच सोडत नाही
कितीही बिझी असली तरीही फोन करायला विसरत नाही,
रागात असली तरी प्रेम करायच थांबवत नाही
म्हणूनच आई तुझ्यापासून मी लांब राहूच शकत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
असावी काहीतरी पूर्व जन्माची पुण्याई की जन्म तुझ्या गर्भात घेतला,
पाहिलही न्हवत जग तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
Leave a Reply