Happy diwali wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

Happy diwali wishes in Marathi

Happy diwali wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत | Dipawali wishes in Marathi | दिवाळी निमीत्त पाठवा मराठीत शुभेच्छा संदेश, व्हाट्सअप स्टेटस

Happy diwali wishes in Marathi

Happy diwali wishes in Marathi : दिवाळी हा भारतीयांचा प्रमुख सण आहे. या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून आई सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह लंकेतून अयोध्येला परतले. प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीता अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळी हा असाच एक सण आहे. जो केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी आपल्या प्रियजनांना मराठीत संदेश पाठवा.

दिपावलीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,

दिपावली पासून ते भाऊबीज पर्यंत,

साजरा होत असलेल्या आनंदमयी,

उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व

आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छ!

हे नववर्ष आपणास आनंदी,

भरभराटीचे, प्रगतीचे,

आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,

मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा

प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,

सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही

आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली

सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली.


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


आणखी माहिती वाचा : Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये


उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास,

फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी,

आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.

शुभ दीपावली!


छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,

आई जगदंब देवीच्या क्रुपेने,

तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.


दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,

जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,

दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,

फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,

अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,

सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.


तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा

आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट,

पुन्हा आला प्रकाशाचा सण,

तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी

आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून

आपणास आणि आपल्या परिवारास

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.


दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


फटाक्यांची माळ,

विजेची रोषणाई,

पणत्यांची आरास,

उटण्याची आंघोळ,

रांगोळीची रंगत,

फराळाची संगत,

लक्ष्मीची आराधना,

भाऊबीजेची ओढ,

दीपावलीचा सण आहे

खूपच गोड..

दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!


आज बलिप्रतिपदा!

दिवाळी पाडवा,

राहो सदा नात्यात गोडवा..

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).

साडेतीन मुहूर्तांपैकी एक..

बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या

परिवारास मनापासून शुभेच्छा..

शुभ दीपावली!


धन त्रयोदशी !!

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली..!


नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..

नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..

सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..

शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..

दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!


आली दिवाळी उजळला देव्हारा..

अंधारात या पणत्यांचा पहारा..

प्रेमाचा संदेश मनात रुजावा..

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*